Goa ZP Election: भाजपची तिसरी यादी जाहीर! जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आणखी 9 उमेदवारांची नावे निश्चित; आतापर्यंत 38 जागांवर कमळाचे उमेदवार

BJP Third List: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावांची तिसरी यादी जाहीर केली
 BJP Goa ZP candidates
BJP Goa ZP candidatesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa district panchayat elections: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या उमेदवारांच्या नावांची तिसरी यादी आज, बुधवार (दि.३) जाहीर केली. पक्षाच्या राज्य निवडणूक समितीने नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आणखी ९ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. या ९ नावांसह भाजपने आतापर्यंत जि. प. निवडणुकीसाठी एकूण ३८ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

उत्तर गोव्यातील चार जागा

तिसऱ्या यादीत उत्तर गोव्यातील पाच महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. यात महिला आणि ओबीसी आरक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे:

०३- धारगळ (जनरल): श्रीकृष्णा (नानू) रवींद्र हरमलकर

०४- तोरसे (OBC): रघुबा लाडू कांबळी

१४- सांताक्रुझ (महिला-OBC): सोनिया विदेश नाईक

२०- कारापूर-सर्वण (जनरल): महेश अनंत सावंत

२१- माशेल (महिला): कुंदा विष्णू मांद्रेकर

 BJP Goa ZP candidates
Goa ZP Election: गोवा फॉरवर्ड साधणार दत्त जयंतीचा मुहूर्त! युतीबाबत अद्याप सावळा गोंधळ; आरजीपीच्‍या कोअर समितीची होणार बैठक

दक्षिण गोव्यातील चार जागा

दक्षिण गोवा जिल्हा परिषदेसाठीही भाजपने चार महत्त्वाच्या जागांवर महिला आणि आरक्षित गटातील उमेदवारांना संधी दिली आहे:

०६- बोरी (महिला): पूनम चंद्रकांत सामंत

०७- शिरोडा (महिला): डॉ. गौरी सुभाष शिरोडकर

१४- गिरादोली (ST): गोकुळदास महादेव गावकर

२२- कोला (महिला-OBC): सौ. तेजल अजय पागी

५० जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार

भाजपने या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवून ५० पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यापूर्वी भाजपने १९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आतापर्यंत ३८ उमेदवार जाहीर झाले असले तरी, भाजपने मित्रपक्ष मगोपला ३ जागा दिल्या आहेत आणि निवडक अपक्ष उमेदवारांनाही पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उर्वरित जागांवर भाजप आपले उमेदवार उतरवते की, अपक्षांना समर्थन देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com