Panjim Municipal Corporation Dainik Gomantak
गोवा

Ashtami Ferry: पणजी अष्टमी फेरीच्या अर्जांची आज विक्री

Panjim Ashtami Ferry: दुकानदारांची गर्दी: सकाळपासून मांडला होता ठिय्या

दैनिक गोमन्तक

Panjim Ashtami Ferry: पणजीत भरणाऱ्या अष्टमीच्या फेरीसाठी आज महापालिकेसमोर दुकानदारांनी गर्दी केली होती.

महानगरपालिकेतर्फे दुकानदारांना अर्जांचे वाटप उद्या, मंगळवारी केले जाणार असल्याची माहिती महापौर रोहन मोन्सेरात यांनी दिली.त्यानंतर सकाळपासून ठिय्या मांडलेले दुकानदार माघारी फिरले.

गतवर्षी अर्जांचा झालेला घोळ पाहता महानगरपालिकेने यावर्षी खबरदारी घेतलेली आहे. राज्यातील पारंपरिक व्यवसायिकांना प्राधान्य असेल, फेरी धक्क्यापासून ते कला अकादमीच्या पदपथावर हे स्टॉल असतील.

साधारणतः ४०० स्टॉल उभारले जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. एका व्यक्तीला एक अर्ज दिला जाणार आहे. अर्ज वितरणात कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट बजावले आहे, असेही ते म्हणाले.

फेरी संपल्यानंतर त्या ठिकाणी महानगरपालिकेला तीन ते चार दिवस स्वच्छता करण्यासाठी लागतात, यावर्षी फेरीमध्ये दुकानदारांनी कचरा करू नये यासाठी संबंधितांना स्पष्टपणे सूचना केल्या जातील,असे पालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

एका अर्जासाठी 5-6 जणांना उभे केले !

काहीजणांना आज अर्ज विक्री होईल, अशी आशा लागून होती. त्यामुळे दुपारपर्यंत व्यावसायिक महापालिका परिसरात होते.

एका-एका व्यावसायिकाने पाच ते सहाजणांना अर्जांसाठी उभे केल्याच्या तक्रारी महापालिकेकडे गेल्या आहेत. महानगरपालिका दुकानदारांकडून यावर्षी २५० रुपये प्रति चौ. मी. या दराने भाडे आकारले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT