Traffic Signal: राज्यातील बहुतांश वाहतूक सिग्नल निष्क्रिय

राज्यभरातील बहुतांश महत्त्वाच्या मार्गावरील ट्रॅफिक सिग्नल कार्यान्वित नसल्याचे आढळून आले आहे.
Traffic Signal
Traffic SignalDainik Gomantak
Published on
Updated on

Traffic Signal: राज्यभरातील बहुतांश महत्त्वाच्या मार्गावरील ट्रॅफिक सिग्नल कार्यान्वित नसल्याचे आढळून आले आहे. हे ट्रॅफिक सिग्नल तातडीने कार्यान्वित न केल्यास अपघातांची दाट शक्यता असल्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Traffic Signal
Janata Darbar Vasco: वास्कोतील दरबारात जनतेऐवजी अधिकारीच!

वेर्णा औद्योगिक वसाहत, मडगाव शहर, पणजी शहर, दाबोळी विमानतळाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅफिक सिग्नल्स बहुतेक वेळा सदोष आणि कार्यान्वित नसलेले दिसतात. या रस्त्यांवर धावणाऱ्या अतिवेगवान वाहनांसाठी हे निकामी ट्रॅफिक सिग्नल्स चिंतेचे मुख्य कारण बनले आहेत.

काही प्रवाशांनी सांगितले की, त्यांना रस्ता ओलांडणे आणि ट्रॅफिक सिग्नल न पाहता जंक्शनमधून जाणे कठीण होत आहे. वाहनांचा अंदाज चुकला तर वाहनांची धडक होऊन जखमी होऊन जीवितहानीची दाट शक्यता असते.

Traffic Signal
Architecture College: आर्किटेक्चर विद्यार्थ्यांचा थेट वर्गावरच बहिष्कार

योग्य रस्ते देणे आणि या ट्रॅफिक सिग्नल्सची नियमित देखभाल करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. हे ट्रॅफिक सिग्नल रस्ते वाहतुकीचा महत्त्वाचा भाग बनतात कारण हजारो वाहने दिवस-रात्र रस्ते आणि उड्डाणपुलांवर ये-जा करतात. ही वाहने अनियंत्रित राहिल्यास अपघाताची शक्यता वाढेल, असे एक प्रवासी शिल्पा यांनी सांगितले.

रोहन नाईक या प्रवाशाने सांगितले की, आजकाल सिग्नल स्टेशनवर लहान मुले भीक मागताना दिसतात. मला असे वाटते की हे भिकारी ट्रॅफिक सिग्नल्समध्ये मुद्दामहून काहीतरी बिघाड करत असावेत. या वाहतूक सिग्नल्सची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com