Tinted Glass In Goa ‘टिंटेड ग्लास’ प्रकरणी 35 हजार वाहनांना दंड

वाहतूक अधीक्षक अक्षत कौशल: पर्यटन मोसमात विविध मोहिमा राबवणार
Tinted Glass In Goa
Tinted Glass In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Tinted Glass In Goa: पुढील महिन्यापासून पर्यटन मौसम सुरू होत आहे, त्यामुळे वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ठोस पावले उचलण्यात येतील. मद्यपी चालकांविरुद्ध व रात्रीच्यावेळी काळ्या काचा (टिंटेड ग्लास) असलेल्या वाहनांविरुद्धच्या कारवाईला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. यावर्षी आतापर्यंत सुमारे 35 हजार वाहन मालकांना काळ्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे.

Tinted Glass In Goa
Traffic Signal: राज्यातील बहुतांश वाहतूक सिग्नल निष्क्रिय

वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचा परवाना रद्द करण्यासाठी वाहतूक खात्याकडे शिफारस करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

राज्यात हल्लीच गेल्‍या महिन्यापासून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघातांस कारणीभूत झाल्याच्या घटनांची दखल घेऊन ठोस पावले उचलण्यात आली आहेत. रात्री वाहतूक पोलिस किनारी भागात तैनात करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

या भागात मद्यालये व पबमधून बाहेर पडणाऱ्या लोकांवर नजर ठेवून ते वाहन चालवत असल्यास त्यांना तिथेच रोखण्यात येईल तसेच अधुनमधून किनारी भागात नाकाबंदी करून मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. पर्यटन मोसमात ही मोहीम सुरूच ठेवली जाईल. पोलिसांची कमतरता भासू नये म्हणून खात्याकडे जादा कर्मचारी पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. मद्यपी चालकांचे प्रमाणही गेल्यावर्षीपेक्षा अधिक वाढल्याने मोहिमेसाठी अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले आहे, असे ते म्हणाले.

Tinted Glass In Goa
Janata Darbar Vasco: वास्कोतील दरबारात जनतेऐवजी अधिकारीच!

काळ्या काचा लांबून दिसत नाहीत!

पर्वरी येथील तरुणीचा खून करून तिचा मृतदेह विल्हेवाटीसाठी वापरलेल्या काळ्या काचांच्या वाहनाविरोधात पर्वरी ते आंबोली या रस्त्यादरम्यान वाहतूक पोलिसांकडून कारवाई झाली नाही, यासंदर्भात स्पष्टीकरण देताना अधीक्षक कौशल म्हणाले, रात्रीच्यावेळी वाहनाच्या काळ्या काचा लांबून दिसत नाहीत, ते वाहन जवळ आल्यानंतरच त्याचा अंदाज येतो. मात्र तोपर्यंत हे वाहन पुढे गेलेले असते. त्यामुळे अनेकदा अशी वाहने रात्रीच्यावेळी पोलिसांच्या नकळत कारवाईविना निघून जातात. यासंदर्भात वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना रात्री वाहन तपासणी गंभीरतेने करण्याचे निर्देश दिले आहेत, असे कौशल म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com