Sal River  Dainik Gomantak
गोवा

सासष्टीतील जीवनदायिनी जलप्रदुषणाच्या विळख्यात

स्वच्छता हवी: साळ नदीसाठी केंद्र व राज्यातर्फे 102 कोटींचा निधी उपलब्ध

दैनिक गोमन्तक

सासष्टी: साळ नदी म्हणजे सासष्टी तालुक्यातील जीवनदायी. मात्र साळ नदी आपले अस्तित्व गमावू लागली आहे. कारण मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. स्वच्छतेसाठी 102 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या नदीतील हे प्रदूषण त्वरित रोखण्यासाठी कृतीची गरज आहे, असे मत पर्यावरणप्रेमी, ग्रामस्थांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

सासष्टी तालुक्यातील साळ नदी ही गोव्यातील तिसऱ्या क्रमांकाची लांबी असलेली नदी असून तिची लांबी जवळ जवळ 40 कि.मी. आहे. या नदीच्या दोन्ही बाजूला नुवे, खारेबांद, बाणावली, कारमोणा, कुंकळ्ळी, वेळ्ळी, बेतुल या गावांची लोकवस्ती आहे.

प्रथम केंद्र, राज्य सरकार यांच्यासह नगरपालिका व पंचायतींनी साळ नदीच्या स्वच्छतेसाठी प्रमाणिक कृती केली पाहिजे. साळ नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी केंद्र सरकारने ६० कोटी रुपयांचा

निधी मंजूर केला होता. नंतर राज्य सरकारने 42 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र या निधीचा विनियोग कुठे, कसा व कधी झाला? कळणे कठीण आहे. सध्या गाळ उपसण्याचे काम चालू आहे. मात्र हे काम इतके सावकाशपणे चालू आहे, त्याचे 80 क्के सुद्धा काम पूर्ण झालेले नाही. निधी मंजूर झाला होता, तो शुद्धीकरणासाठी, निचरा उपसण्यासाठी, नदीच्या दोन्ही बाजूच्या कठड्यावर भिंत बांधण्यासाठी व इतर संबंधित कामासाठी होता.

सांडपाणी, कचरा नदीत

नदी प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहे. नदीच्या काठावर जी वस्ती आहे. तेथील लोक सांडपाणी व कचरा या नदीच्या पात्रात टाकतात. कुंकळ्ळी औद्योगिक परिसरातील कंपन्यांचे दूषित पाणी या नदीत सोडले जाते. मडगावसह सासष्टीत मलनिस्सारण समस्या अजून कायम आहे. शिवाय या परिसरात कचरा प्रक्रिया प्लांटची सुविधा नाही.

स्वच्छतेसाठी याचिका

साळ नदी अस्तित्वासाठी व पुर्नरुद्धारासाठी तळमळते आहे. हे महान काम केवळ स्थानिक लोकच करु शकतात. वेगवेगळ्या पर्यावरणप्रेमींनी, निम सरकारी संस्थांच्या साळ नदीच्या अस्वच्छतेसंदर्भात अनेक याचिका लवादाकडे सुनावणिसाठी आहेत. सरकारचे दुर्लक्षही साळ नदीच्या प्रदूषणासाठीचे एक कारण आहे. जो सरकार सत्तेवर येईल किंवा सासष्टीत जे आमदार निवडून येतील त्यांच्यापुढे साळ नदी प्रदूषणमुक्त करण्याचे मोठे आव्हान आहे.

पर्यटनासाठी उपयोग

शॅडो कौन्सिलचे अध्यक्ष सावियो कुतिन्होच्या म्हणण्याप्रमाणे साळ नदीच्या स्वच्छतेसाठी लाखो, करोडो रुपये खर्च केले जातात. पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. सर्वप्रथम साळ नदीच्या पात्रात जाणारी घाण अडविणे गरजेचे असल्याचे कुतिन्हो म्हणतात. जर साळ नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त केली तर पर्यटनासाठी उपयोगी होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजीमध्ये गोव्याची यशस्वी घोडदौड सुरु; अरुणाचल विरोधात कश्यपने झळकवले द्विशतक

Saint Francis Xavier Exposition: सोहळा तोंडावर, पण रस्त्याची दुरावस्थाच! जुने गोवे-पिलार मार्गावर खड्ड्यांचं 'प्रदर्शन'

Cash For Job Scam: वास्कोमधून 420चे आणखीन एक प्रकरण उघडकीस; 6 लाख लुबाडल्याने आई-मुलाला अटक

Verna: वेर्णा येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण रद्द; सुरक्षा व्यवस्थापन समिती बैठकीत निर्णय

खरी कुजबुज: गणेश गावकर नॉट रिचेबल

SCROLL FOR NEXT