विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पर्याय द्यावेत: म्हापशातील पालक

म्हापशातील पालकांची मागणी: शिक्षण संचालकांशी चर्चा
ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षणDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: अध्ययनाबाबत शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावेत व त्याबाबत कोणतीही सक्ती करू नये, ही मागणी पुढे करून म्हापशातील पालकांनी आज सोमवारी शिक्षण खात्याच्या पर्वरी येथील कार्यालयात जाऊन शिक्षण संचालक भूषण सावईकर यांच्याशी चर्चा केली.

या वेळी प्रवीण आसोलकर, सलमान खान, अब्बुल रहीम शेख, सुशांत दुर्भाटकर, पूनम नाईक-आजगावकर, श्रद्धा आरोलकर, हसन शेख, शैलेंद्र मयेकर व इतर पालकांची उपस्थिती होती. दोन दिवसांपूर्वी म्हापसावासीय पालकांनी यासंदर्भात शिक्षण संचालकांना लेखी निवेदन सादर केले होते व आपल्या विविध मागण्यांच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा शिक्षण खात्याच्या कार्यालयात जाऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केला.

ऑनलाईन शिक्षण
भरधाव कारची वीजेच्या खांबाला धडक

पालकांच्या मागणीला अनुसरून यासंदर्भात सरकारचा सकारात्मक निर्णय झाला असून, उद्या मंगळवारी लेखी स्वरूपात पालकवर्गाला कळवले जाईल, असे आश्वासन सावईकर यांनी आपणांस दिले असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते सलमान खान यांनी सांगितले. आपण यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोललो असून या मागण्यांबाबत ते अनुकूल असल्याचे सावईकर यांनी म्हापसावासीयांच्या या शिष्टमंडळाला सांगितले.

ऑनलाईन शिक्षण
‘देवराई’ हे वाघांचे शेवटचे घर: राजेद्र केरकर

सुरक्षिततेकडे लक्ष द्या

विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काही अघटीत घडले, तर विद्यालयाची कोणतीही जबाबदारी नाही, असे पालकांकडून लिहून घेणे अतिशय गैर आहे. मुख्याध्यापक अशा प्रकारे स्वत:ची नैतिक जबाबदारी झटकून टाकत असून, ते अतिशय चुकीचेच आहे. विद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करायलाच हवा, असे पालक सलमान खान म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com