BJP ST Morcha PresidentPrabhakar Gaonkar  Gomantak Digital Team
गोवा

Salcete News : भाजप एसटी मोर्चातर्फे राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांचे अभिनंदन

सर्वोच्च नागरी सन्मान : सुरीनाम प्रजासत्ताकच्या पुरस्काराने गौरव

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete News : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सुरीनाम प्रजासत्ताकने ‘द ग्रॅंड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टार’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना हा पुरस्कार सुरीनाम प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष चंदविकापेरसाद संतोखी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराने सन्मानित होण्याऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय आहेत. सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या एसटी मोर्चाने त्यांचे अभिनंदन केले आहे, अशी माहिती आज मोर्चाने मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष प्रभाकर गावकर यांनी दिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज रात्री नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. त्यात गोव्याचे सभापती रमेश तवडकर व भाजप एसटी मोर्चाचे राज्य अध्यक्ष प्रभाकर गावकर यांचा समावेश आहे, असे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

आजच्या पत्रकार परिषदेत एसटी मोर्चाच्या बहुतेक मागण्या मान्य केल्यामुळे तसेच समाजासाठी वेगवेगळ्या योजनांची कार्यवाही सुरू केल्याबद्दल भाजप एसटी मोर्चाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही आभार मानले आहेत.

योजनांसाठी 20 कोटी

आदिवासी समाजासाठी जे अनुदान वितरीत केले जाते व ते समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविले जाते, असे धाकू मडकईकर यांनी सांगितले. वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात आणखी 20कोटी रुपये अनुदान दिले जाईल, असेही ते म्हणाले.

समाजासाठी सर्वांनी एकत्र यावे

एकमेकावर टिका न करता समाजातील सर्व घटकांनी, नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास समाजाच्या मागण्या मान्य होण्यास कसलीही अडचण येणार नाही. केंद्रात किंवा राज्यातही कॉंग्रेसच्या राजवटीत एसटी समाजासाठी काहीही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता, असे अँथनी बार्बोझा यांनी सांगितले.

समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देणार

एकलव्य योजना लागू केल्यामुळे एसटी समाजातील विद्यार्थ्यांवरील शिक्षणाच्या खर्चाचा बोझा कमी झाला आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातही समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्यास भाजप एसटी मोर्चा प्रयत्नशील आहे. आमचा भाजपच्या नेतृत्वावर पूर्ण विश्र्वास असून 2027 पर्यंत एसटी सामाजाल आरक्षण मिळेल, असा विश्र्वास मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT