

डिचोली: गावकरवाडा - डिचोली येथील श्री शांतादुर्गा मंदिर परिसरात आंब्याची भली मोठी फांदी कोसळण्याची घटना घडली. ही फांदी वीजवाहिन्यांवर कोसळल्याने विजेचा एक खांबही मोडला. झाड कोसळण्याची ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
वीजवाहिन्या तुटून खांब मोडल्याने जवळपास अडीच तास गावकरवाडा परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती काम केल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. या घटनेत मात्र कोणताही अनर्थ घडला नाही.
डिचोली अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर अर्जुन धावस्कर यांच्या नेतृत्वाखालील दलाच्या जवानांनी मदतकार्य करून फांदी हटवली. फांदी कोसळल्यामुळे बसस्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूकही अडकून पडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.