Goa Board: नववी ते बारावीसाठी नवीन विषय समाविष्ट

शिक्षण मंडळ : पसंतीच्या विषयाची सवलत
Goa Board
Goa Board Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Board of Secondary and Higher Secondary Education गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा नववी, दहावी, अकरावी व बारावीत नवीन विषयांचा समावेश केला असून हा नवीन बदल यंदा नववीपासून लागू होणार आहे.

शालान्त मंडळाने सहा प्रमुख विषयांव्यतिरिक्त सातव्या विषयासाठी एकूण एकोणीस विषयांतून एक विषय निवडण्याची सवलत विद्यार्थ्यांना दिली आहे. इंग्रजी, हिंदी, तिसरी भाषा, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या सहा विषयांव्यतिरिक्त सातवा विषय शिकण्याची सोय केली आहे.

Goa Board
Monsoon Update: नैऋत्य मोसमी पाऊस आज कर्नाटकात

यात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) हा विषय लागू केला आहे. सातवा विषय म्हणून विद्यार्थी आता कृत्रिम बुद्धिमत्ता, खगोलशास्त्र, शारीरिक शिक्षण, फाईन आर्ट याशिवाय राष्ट्रीय कौशल्य पात्रता रचनेचे परिधान, इलेक्ट्रॉनिक्स, फलोत्पादन, लॉजीस्टिक, पर्यटन, आरोग्य सेवा, अशा विषयातून एक सातवा विषय विद्यार्थी निवडू शकतात.

Goa Board
Budget: वेळेत निधी मिळत नाही!

अनेक बदल; पण...

गोवा शालान्त मंडळाने भविष्यात अनेक बदल सुचविले आहेत केंद्रीय मंडळाप्रमाणे दहावी व बारावीत कोणत्याही पाच विषयांत उत्तीर्ण होण्याचा फॉर्म्युला लागू करण्याचे ठरविले असल्याचे कळते. यात त्रिसुत्री भाषा पद्धत संपुष्टात येणार असल्याचे कळते.

गोमंतकीय इतिहासाला प्राधान्य

अकरावीचे कोकणी व इतिहासाचे नवीन पाठ्यपुस्तक या वर्षापासून लागू करण्यात आले आहे. अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात गोमंतकीय इतिहासाला महत्त्व देण्यात आले आहे.

पुरातन गोमंतक, मध्ययुगीन गोमंतकाचा इतिहास व आधुनिक गोमंतकाचा इतिहास या नवीन पुस्तकात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com