Goa Water Problem Dainik Gomantak
गोवा

Goa Water Crisis: ..आता पाण्याच्या बाटल्यांचाच आधार! सासष्टीतील अनेक भागांत पाणी टंचाई; ठोस उपाययोजना नाही

Salcete Water Crisis: जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर सांगतात की गोव्यात पाणी टंचाई होणार नाही एवढा पाण्याचा साठा आहे. मात्र, परिस्थिती याच्या उलट आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर सांगतात की गोव्यात पाणी टंचाई होणार नाही एवढा पाण्याचा साठा आहे. मात्र, परिस्थिती याच्या उलट आहे. सासष्टीतील राय, नावेली, बाणावली, कोलवा, कुडतरी व मडगावमधील काही भागांत पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी या भागातील लोक करू लागले आहेत.

पाणी टंचाई परिस्थिती गत दोन आठवड्यापासून सुरू असल्याचे लोक सांगतात. त्यांना आता बाजारातील बाटलीबंद पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

ही या वर्षीचीच बाब नसून दरवर्षी आम्हाला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे कोलवा येथील रहिवासी मिलाग्रेस फर्नांडिस यांनी सांगितले. गेल्या कित्येक वर्षांपासून ही बाब आम्ही सरकारच्या कानावर घालत आहोत. मात्र, त्याचे निरसन केले जात नसल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. नावेलीत केवळ एका तासासाठी पाणीपुरवठा होत आहे.

पाण्याची टंचाईमुळे नागरिकांबरोबरच रेस्टोरंट, आरोग्य केंद्र यांच्यावरसुद्धा परिणाम होताना दिसत आहे. पाणी टंचाईविरोधात हाऊसिंग बोर्ड घोगळमधील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. संबंधित खात्याकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना केली जात नाही. पाणीपुरवठ्याची जीर्ण झालेली जलवाहिनी, दुरुस्ती व देखरेखीचा अभाव ही या पाणी टंचाईमागची कारणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT