Goa Water Crisis: जलसंपदा खाते म्हणते पाणी आहे! मग 'ठणठणाट' का? कोणत्या भागांमध्ये भेडसावते आहे समस्या? जाणून घ्या

Goa Water Problem: राज्यात बांधकामांना परवानगी देताना पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करण्यात आलेला नाही. शिवाय बेकायदा आणि अनियमित बांधकामे फोफावली आहेत.
Sattari Water Crisis, Goa Water Crisis
Goa Water ProblemDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील धरणांत दोन महिने पुरेल एवढा जलसाठा असल्याचे जलसंपदा खात्याचे म्हणणे असले तरी वाढत्या मागणीमुळे राज्यभरात ठिकठिकाणी पाणी टंचाई डोके वर काढू लागली आहे. राज्यात ६७२ दशलक्ष लीटर प्रक्रिया केलेले पाणी दररोज उपलब्ध होत असले तरी ८० ते १०० दशलक्ष लीटर पाणी कमी पडत असल्याचा सरकारी यंत्रणेचा अंदाज आहे.

सरकारी आकडेवारी पाहिल्यास भूगर्भजल पुनर्भरण ०.३९ अब्ज घनमीटरवरून ०.३८ अब्ज घनमीटरपर्यंत घसरले आहे. याशिवाय वार्षिक भूजल उपसा ०.०६८ अब्ज घनमीटरवरून ०.०७१ अब्ज घनमीटरपर्यंत वाढला आहे. त्यामुळे भविष्यात राज्यासमोर पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहू शकते. राज्यात बांधकामांना परवानगी देताना पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करण्यात आलेला नाही. शिवाय बेकायदा आणि अनियमित बांधकामे फोफावली आहेत.

इमारती वाढल्या; पण पुरवठा यंत्रणा तीच

ग्रामीण भागातही मोठ्या गृहनिर्माण संकुलांचे पेव फुटले आहे. रेती काढण्यास बंदी असतानाही बांधकामांचा वेग मंदावलेला नाही. अशाप्रकारे उभ्या राहणाऱ्या बांधकामांत राहणाऱ्यांना पाणी पुरवण्याची जबाबदारी पेलण्यात सरकारी यंत्रणा कमी पडणार हे ठरून गेलेले असते. त्यामुळे सध्याचे पाणी टंचाईचे चित्र आहे. अनेक ठिकाणी गावात २० वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी आणि त्यावेळचीच जलवाहिनी आहे. वस्ती मात्र वाढत गेली आहे. अगदी डोंगराचा माथाही बांधकामांसाठी व्यर्ज मानला गेलेला नाही.

Sattari Water Crisis, Goa Water Crisis
Water Crisis: सत्तरीत तळी, नद्यांची पाणी पातळी घटली! शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह; बागायतींमधील सिंचनावर परिणाम

दक्षिण गोव्यात आज मर्यादित पाणीपुरवठा

साळावली पाणीपुरवठा प्रकल्पाच्या वेर्णा भागातील १२०० एमएमएमएस पाईपलाईनमध्ये लिकेज असल्यामुळे आज (ता. १४) मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को व मुरगाव भागांत तसेच सासष्टीतील बाणावली, नुवे, कुडतरी तसेच सांत आंद्रे येथे मर्यादित प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात आला. ही स्थिती गुरुवार, १५ मे रोजीही कायम असेल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

Sattari Water Crisis, Goa Water Crisis
Bardez Water Crisis: 3 महिन्यांपासून पाण्याची समस्या! बार्देशवासीय संतप्त; म्हापसा येथे PWD अभियंत्याला घेराव

कुठे भेडसावतेय पाणी टंचाई?

१. मांद्रे (पंचायत क्षेत्रातील ११ वाडे), २. कोरगाव (देवसू, भालखाजन, भटवाडी, सुकाळे), ३. धारगळ (तिवाडा, दोन खांब परिसर, चिचोला), ४. न्हयबाग-अमेरे-पोरस्कडे, ५. विर्नोडा (अमयवाडा, भूतवाडी, मालपे), ६. हणजूण (बंदिरवाडा, आसगाव, बादे, झरवाडा) ७. वेर्ला-काणका, ८. कुडका ९. पाळ्ये, १०. बांबोळी, ११. नावशी, १२. झर्मे, १३. हिवरे, १४. वांते, १५. ओवळे, १६. आंबेशी- पाळी, १७. केपे (कुपवाडा, गावकरवाडा, बार्से, मोरपिर्ला), १८. सावर्डे (आंबेउदक, पेरीउदक, कष्टी, काले), १९. काणकोण (मास्तीमळ, आगोंद, गावडोंगरी, खोतिगाव), २०. लोलये (पोळे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com