Water Crisis: सत्तरीत तळी, नद्यांची पाणी पातळी घटली! शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह; बागायतींमधील सिंचनावर परिणाम

Goa Water Problem: सुपारी, नारळ, केळी, मिरी अशी पिके मुख्यत्वेकरून सिंचन करावी लागतात. पण सद्या ऐन उन्हाळ्यातील मे महिन्यात पाण्याची पातळी घटली आहे.
Goa Water Crisis
Drip irrigation affected in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्यात शेती-बागायतींमधील पिकांना झरे, ओहोळ, तळी, नद्या अशा विविध जलस्रोतांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होते. मात्र, मे महिन्यात नदीतील बंधाऱ्यांसह या विविध जलस्त्रोतांमधील पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळे बागायती सिंचनावर परिणाम जाणवत आहे.

सत्तरी तालुक्यातील बागायतदार वैयक्तिक जागेतील झरे, ओहोळ, तळी तसेच नदीमधील बंधाऱ्यांच्या माध्यमातून ठिबक, तुषार सिंचनाव्दारे बागायती पिकांना पाणी पुरवित असतो. असे लोकांच्या मालकीच्या, सार्वजनिक वैयक्तिक झरे, ओहोळ, तळी यातील पाण्याची पातळी बरीच घटली आहे.

सुपारी, नारळ, केळी, मिरी अशी पिके मुख्यत्वेकरून सिंचन करावी लागतात. पण सद्या ऐन उन्हाळ्यातील मे महिन्यात पाण्याची पातळी घटली आहे. सरकारतर्फे जलसिंचन विभागातर्फे सत्तरी तालुक्यात गावातील नदीच्या पात्रात बंधारे घातले आहेत. या बंधाऱ्यात आता पाणी कमी दिसत आहेत.

Bardez Water Shortage
Bardez Water Shortage Dainik Gomantak

सोनाळ तारचे नागरिक रणजीत राणे म्हणाले, की सोनाळ, सावर्डे गावात म्हादई नदीपात्रात सरकारने बंधारे उभारले आहेत. हिवाळी, उन्हाळी हंगामासाठी हे बंधारे पाणी अडवितात; पण बंधाऱ्यात घातलेल्या फळ्यांमधून पाणी वाहते. त्यामुळे ऐन मे महिन्यात सिंचनावर परिणाम झाला आहे. मागील तीन दिवसांत म्हादई नदीपात्रातील पाणी बरेच कमी झाले आहे. त्यामुळे बागायती पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.

Goa Water Crisis
Bardez Water Crisis: 3 महिन्यांपासून पाण्याची समस्या! बार्देशवासीय संतप्त; म्हापसा येथे PWD अभियंत्याला घेराव

पाण्याची गळती थांबवा

म्हादई पात्रातून म्हादई नदीपात्राचा अर्धाहून जास्त भाग सुकलेला दिसून येतो. म्हादई पात्रातून आता एकाच बाजूने पाण्याचे वहन होत आहे. या नदीपात्रात घातलेले बंधारे व्यवस्थित दुरुस्त करून अनावश्‍यकरित्या वाहून जाणारे पाणी थांबविले पाहिजे. नदीतील बंधारे पाणी अडविण्यात अयशस्वी ठरत असल्याने पाणी कमी झाले आहे, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे म्हादई नदीपात्रात काही ठिकाणी खडखडाट दिसत आहे.

Goa Water Crisis
Free Water Scheme: सरकारची ही कृती गोमंतकीय विरोधी! मोफत पाणी योजना बंदीवरून सरदेसाईंचा सरकारवर घणाघात

वेळोवेळी बंधाऱ्यांची डागडुजी हवी

म्हादई नदीपात्र काही ठिकाणी कोरडे झाले आहे. बंधाऱ्याच्या फळ्यांमधून वाहणारे अनावश्‍यक पाणी रोखले पाहिजे. जलसिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांनी अशा बंधाऱ्यांच्या ठिकाणी दर महिन्याला दोनवेळा तरी लक्ष देऊन बंधारे व्यवस्थित आहेत की नाहीत, हे पाहिले पाहिजे. सध्या म्हादई नदीपात्रातील पाण्याची घट झाल्याने सिंचनावर विपरीत परिणाम झाला आहे, असे रणजीत राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com