Salaulim Dam OverFlow Dainik Gomantak
गोवा

Salaulim Dam Overflow: अवकाळी पावसामुळे साळावली धरण ओव्हरफ्लो...

धरण दुथडी भरून वाहू लागले

Kavya Powar

Salaulim Dam OverFlow: काल (बुधवार) अवकाळी पावसामुळे सगळ्यांची धांदल उडाली. या मुसळधार पावसामुळे साळावली धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. राज्यात पाऊस संपल्यानंतर धरण पहिल्यांदाच पूर्ण भरले आहे.

काल दिवसभरात एकूण 58.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. दाबोळीत सर्वाधिक 4 इंच पावसाची नोंद झाली आहे. पहाटे 5 वा. गडगडाटासह दमदार पाऊस बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी काही प्रमाणात वाहतुकीवरदेखील परिणाम दिसून आला. जनजीवनदेखील विस्कळीत झाले.

अचानक मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे राज्यात सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरदेखील परिणाम दिसून आला. क्रीडाग्राम आवाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

अवकाळी पावसामुळे बार्देस तालुकासह शेळपे, धुळेर येथील दोघा शेतकर्‍यांच्या भातपिकाची नासाडी झाली. वेळीच कापणी यंत्र कृषी खात्याच्या यांत्रीक लागवड अधिकार्‍यांनी पुरवले नसल्याने हे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, 3 टप्प्यांत चालना; 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

Tiger Reserve Controversy: नेत्रावळीतील समस्‍या कधी सोडविल्‍या का? व्‍याघ्र प्रकल्‍पावरून केवळ निर्बंध थोपवले; वास्‍तव तपासा, ग्रामस्‍थांची मागणी

Shriram Digvijay Yatra: श्रीराम दिग्विजय यात्रेचे पर्तगाळी मठात आगमन, आतषबाजीने रथाचे स्वागत; मठानुयायी, भाविकांत उत्साहाचे वातावरण

PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

SCROLL FOR NEXT