Unseasonal Rain in Goa: अवकाळी पावसाचा बार्देशातील भातपिकांवर परिणाम; शेतकरी त्रस्त

Unseasonal Rain in Goa: वेळीच कापणी यंत्र कृषी खात्याच्या यांत्रीक लागवड अधिकार्‍यांनी पुरवले नसल्याने नुकसान
Unseasonal Rain in Goa
Unseasonal Rain in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Unseasonal Rain in Goa: अवकाळी पावसामुळे बार्देस तालुकासह शेळपे, धुळेर येथील दोघा शेतकर्‍यांच्या भातपिकाची नासाडी झाली.

वेळीच कापणी यंत्र कृषी खात्याच्या यांत्रीक लागवड अधिकार्‍यांनी पुरवले नसल्याने हे नुकसान झाल्याचा कथित आरोप शेतकरी सुशांत साळगावकर यांनी केला.

दरम्यान, कृषी विभागीय कार्यालयाकडून तालुक्यातील शेतांची व पिकांची पाहणी केली जाणार असून, आवश्यकतेनुसार पीडितांना नुकसान भरपाई दिली जाईल.  

Unseasonal Rain in Goa
Goa Live Updates: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 'अशी' होती गोव्याची कामगिरी

बुधवारी पहाटे पडलेल्या पावसामुळे सुशांत साळगावकर व मयेकर यांच्या शेतातील भात पिक आडवे पडले व त्याची नासाडी झाली.

आमचे भात 15- 20 दिवसांपुर्वी पिकले होते. त्यापासून आम्ही म्हापसा विभागीय कृषी कायालयाच्या यांत्रीक लागवड अधिकार्‍यांकडे मशीन पुरवण्याची मागणी केली होती.

पण आमच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मी कृषी संचालकांचे लक्ष वेधले. कृषी संचालकांच्या सूचनेनंतरही कापणी यंत्र उपलब्ध केले नाही.

त्यामुळे पुन्हा कृषी संचालकांशी संपर्क साधला तेव्हा मंगळवारी संध्याकाळी 6 वा. हार्वेस्टींग मशीन देण्यात आले.

या मशीनने रात्री 11 पर्यंत चार पैकी दोघा शेतकर्‍यांच्या शेतातील भात कापणी केली आणि मशीनचे बॅरींन नादुरूस्त झाले. त्यानंतर उर्वरीत आम्हा शेतकर्‍यांची भात कापणी राहिली व रात्रीच्या पावसात पीक खराब झाले.

यात माझ्या साडेसात हजार चौरस मीटर जागेतील पीकाची नासाडी होऊन 60 हजारांचे नुकसान झाले, असे साळगावकर यांनी सांगितले.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com