Salaulim Dam Illuminated With Tricolour Dainik Gomantak
गोवा

Salaulim Dam : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर साळावली धरणावर विद्युत रोषणाई

मंत्री सुभाष फळदेसाई व मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते उद्घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Salaulim Dam Illuminated With Tricolour : आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगेतील साळावली धरणावर आज तिरंग्याच्या रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आली. स्थानिक आमदार तथा पुरातन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई व जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

लोकांमध्ये देशप्रेम जागे करण्यासाठी तसेच या धरणाला भेट देणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याच्या हेतूने ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नागरिकांना रात्री 9 वाजेपर्यंत धरणावर फिरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

यावेळी मंत्री फळदेसाई म्हणाले, 'साळावली धरणावर आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाई करण्यात आली. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धरणांवर फोटोग्राफीसाठी मनाई करण्यात आली आहे परंतू साळावली धरणावर फोटोग्राफीसाठी 31 दिवसांची परवानगी देण्यात आलेली आहे."

"तसेच धरणाच्या जलाशयात लवकरच बोटींग सुरु करण्यात येणार आहे. येथील सोमेश्वर मंदिर, उद्यानाला पर्यटक भेट देवू शकतात" असे फळदेसाई म्हणाले.

साळावली धरणावरील मनमोहीत करणारी ही तिरंग्याच्या रंगातील विद्युत रोषणाई सर्वांनी येवून पहावी असे आवाहन मंत्री सुभाष फळदेसाई व जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Politics: मांद्रेतील जनतेच्या मनात कोण? मायकल लोबोंमुळे हवा तापली; अरोलकरांनी दिलं चॅलेंज

Goa Crime: धारदार शस्त्राने वडिलांचा जीव घेणारा प्रमोद 'मानसिक रुग्ण'; बहिणीचा पोलिसांसमोर खुलासा

Goa Electricity: फाईव्ह स्टार एसी, Led दिवे; वीज बचतीबाबत सरकारी कार्यालयांसाठी नवी नियमावली

SCROLL FOR NEXT