River Pollution Dainik Gomantak
गोवा

River Pollution: 'सौंदर्यीकरण झाले, पण स्वच्छतेचे काय?' साळ नदीत सांडपाण्याचा काळा थर; नागरिकांचा संताप

Sal River Water Contamination: सासष्टीची जीवनदायिनी मानली जाणारी साळ नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीच्या पात्रात सांडपाण्याचा काळा थर साचला असून, परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: सासष्टीची जीवनदायिनी मानली जाणारी साळ नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीच्या पात्रात सांडपाण्याचा काळा थर साचला असून, परिसरात दुर्गंधी पसरत आहे. नदीच्या संवर्धनासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले, तरी प्रदूषण रोखण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याची नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नदी प्रदूषित होण्याची मूळ कारणे दूर करण्याऐवजी वरवरच्या उपाययोजनांवर भर दिला जात असल्याची टीकाही होत आहे. नदीतील दूषित पाण्यामुळे शेती आणि मासेमारीवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या समस्येकडे संबंधित सरकारी यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्थानिक शेतकरी रेमंड कॉस्ता यांनी सांगितले की, नदीच्या परिसरात त्यांची शेती आहे. दूषित पाणी शेतात शिरण्याची शक्यता असल्याने त्यांनी शेती करणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी नदीची सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. नदीतील दूषित पाणी मुख्य पात्रातून वाहत अरबी समुद्रात मिसळत आहे. काही युवक नदीत मासेमारी करीत असून, पाण्यावरील काळा थर पाहता येथील मासे आरोग्यास हानिकारक ठरण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

सांतान परेरा यांनी रात्रीच्या वेळी नदी परिसरातील दुर्गंधी असह्य होत असल्याचे सांगितले. पाच वर्षांपूर्वी मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, वाढती बांधकामे आणि सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाचा अभाव यामुळे नदीत प्रदूषण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित सरकारी खात्यांकडे तक्रारी करण्यात आल्या असून, प्रदूषणाची मूळ कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सौंदर्यीकरण नव्हे, स्वच्छतेवर भर द्या!

स्थानिक आमदार वेन्झी व्हिएगश यांनी नदी परिसराचे सौंदर्यीकरण केले; मात्र त्यामुळे प्रदूषणाची समस्या सुटलेली नाही, अशी टीका वाझ यांनी केली. आमदारांनी नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारविरोधात लढा उभारावा, त्यांना स्थानिक नागरिक साथ देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Attack: Apple यूजर्स सावधान! iPhone, iPad आणि MacBook वर सायबर हल्ल्याचा धोका; हॅकर्सपासून वाचण्यासाठी तातडीने करा 'हे' काम

Fake Traffic Challan Scam: बनावट वाहतूक चलनातून ऑनलाइन फसवणूक; तामिळनाडूतून संशयिताला अटक

Legal Metrology Department: गोव्यात वजन-माप विभागाला झडती, जप्तीचे अधिकार; गैरप्रकारांचा संशय आल्यास थेट कारवाई

Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर सुरू होतं प्री-वेडिंग फोटोशूट, अचानक वाऱ्याचा झोत आला अन् नवरी हवेत... फोटोशूटदरम्यान थरारक घटना; पाहा व्हिडिओ

ST Political Reservation: 'एसटी' आरक्षणाची ग्वाही; गोव्याच्या राजकारणात उलथापालथ? चार मतदारसंघांत नवी समीकरणे

SCROLL FOR NEXT