Sal Panchayat Dainiak Gomantak
गोवा

Sal Panchayat: साळमधील रस्त्यांवर मृत्यूचे सापळे? जलवाहिनीच्या कामामुळे उखडले रस्ते; पावसाळ्यात माती खचून मोठ्या अपघाताची भीती

Sal Panchayat Pipeline Project: साळ पंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी नव्या जलवाहिनीचे काम आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या प्रयत्नांतून सुरू आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

साळ: साळ पंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी नव्या जलवाहिनीचे काम आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या प्रयत्नांतून सुरू आहे. खोलपेवाडी-साळ, कासारपाल-साळ आणि मेणकुरे-साळ मार्गांवर जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. यासाठी रस्ते खोदण्यात आले असून अनेक ठिकाणी डांबरीकरण केलेले रस्तेही उकरले गेले आहेत.

काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी फक्त मातीचा भराव टाकण्यात येत असल्याने रस्त्यांची स्थिती अधिकच खराब होत आहे. पावसाळा जवळ आल्याने ही माती खचण्याची शक्यता असून त्यामुळे अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

यामुळे या चरांमध्ये योग्य प्रमाणात दगड, खडी आणि त्यानंतर डांबरीकरण करून रस्ते पूर्ववत मजबूत करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, अशी आग्रही विनंती वाहनधारक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

खरी कुजबुज: कलियुगातील 'लव-कुश'

SCROLL FOR NEXT