Mapusa Road Repair: निवडणुका जवळ येताच म्हापशात विकासाचा 'पाऊस', रस्ते कामाला प्रारंभ; 15 वर्षांपासून तुंबलेली गटारे 8 दिवसांत साफ

Mapusa Road Repair: गेली अनेक वर्षे खराब रस्ते, खड्डे आणि धुळीचा सामना करणाऱ्या म्हापसावासीयांना अखेर काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Mapusa Road Repair
Mapusa Road RepairDainiak Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गेली अनेक वर्षे खराब रस्ते, खड्डे आणि धुळीचा सामना करणाऱ्या म्हापसावासीयांना अखेर काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरातील आंगड आणि बाजारपेठ परिसरात सध्या रस्त्यांच्या ‘मिलिंग’चे काम वेगाने सुरू असून, लवकरच डांबरीकरण करण्यात येणार आहे. मात्र, निवडणुका अवघ्या सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपल्याने अचानक सुरू झालेल्या या कामांमुळे नागरिकांकडून प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.

स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांनी बुधवारी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. प्रभाग क्रमांक ९ मधील अलंकार थिएटर ते मिलाग्रीस चर्च आणि तेथून टॅक्सी स्टँडपर्यंतचा रस्ता सध्या दुरुस्त केला जात आहे. वीज आणि पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधून भविष्यात पुन्हा रस्ते खोदावे लागू नयेत, याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Mapusa Road Repair
Goa Road Accident: दुचाकींच्या धडकेत दोघेजण ठार, बागा येथील दुर्घटनेत अन्य दोघे जखमी; कामावरून घरी परतताना घाला

दरम्यान, १५ वर्षांपासून तुंबलेले गटार अवघ्या आठ दिवसांत साफ झाल्याचा दाखला देत नागरिकांनी प्रशासनावर सवाल उपस्थित केले आहेत. इतकी वर्षे हाल का सोसावे लागले? निवडणुका जवळ आल्यावरच प्रशासन जागे होते का? असे प्रश्न संतप्त म्हापसावासी उपस्थित करत आहेत.

अपघात वाढले!

गेल्या तीन-चार वर्षांत भूमिगत वीजवाहिन्या आणि नव्या पाणीपुरवठा वाहिन्या टाकण्यासाठी शहरातील रस्ते वारंवार खोदण्यात आले होते. मात्र, त्यानंतर करण्यात आलेली डागडुजी अत्यंत निकृष्ट दर्जाची ठरल्याने पावसाळ्यात खड्ड्यांचा आणि उन्हाळ्यात धुळीचा त्रास वाढला होता. बाजारपेठेत अनेक नागरिक घसरून पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com