Sakhali Chaitrotsav Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Chaitrotsav: साखळीत चैत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ, सात दिवस उत्सव; 3 एप्रिल रोजी रंगणार ‘वीरभद्रा’चा थरार

Sanquelim Chaitrotsav 2026 schedule: विठ्ठलापूर-साखळी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात साजऱ्या होणाऱ्या चैत्रोत्सवाला शनिवार, २८ रोजीपासून प्रारंभ होणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

साखळी: विठ्ठलापूर-साखळी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात साजऱ्या होणाऱ्या चैत्रोत्सवाला शनिवार, २८ रोजीपासून प्रारंभ होणार आहे. यावर्षी सात दिवस हा उत्सव चालणार असून ३ एप्रिल रोजी पहाटे प्रसिध्द वीरभद्राचा थरार अनुभवण्याची संधी लोकांना मिळणार आहे.

दरवर्षी साखळीत होणारा हा प्रसिद्ध आणि चैतन्यदायी चैत्रोत्सव म्हणजे एक पर्वणीच असून हजारोंच्या संख्येने भाविक ता उत्सवात सहभागी होत असतात. दर दिवशी श्री विठ्ठल-रखुमाई व सत्यभामाला वेगवेगळ्या स्वरूपात सजविले जाते. विविध अवतार पाहायला मिळतात. दररोज रात्री मंदिराच्या बाजूला खास उभारलेल्या मंडपात दशावतारी नाट्यप्रयोग सादर केले जातात.

अखेरच्या दिवशी रात्री या दशावतारी नाट्यमंडळीकडून ‘वीरभद्रा’चा भाग लावला जातो. हा भाग संपल्यावर पहाटे त्याच मंडपात वीरभद्र सोहळा होतो. हा सोहळा पाहण्यासाठी गोव्याशेजारील राज्यातील भाविक गर्दी करीत असतात.

या उत्सवानिमित्त विठ्ठलापूर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी आपापली दुकाने थाटली आहेत. लहान-सहान हॉटेल्स, खेळण्याची दुकाने, आईस्क्रीम दुकाने थाटण्यात आलेली आहेत. देवस्थान समितीकडूनही सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT