Goa Exposition Ceremony  Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: 82 लाख भाविकांनी घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन, 45 दिवसानंतर सोहळ्याची सांगता

Goa Saint Francis Xavier Exposition End: सोहळ्याची कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांनी विशेष प्रार्थना घेऊन समाप्ती घोषित केली

Akshata Chhatre

Saint Francis Xavier Exposition 2024-25 End

जुने गोवे: दर १० वर्षांनंतर होणारा सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शवप्रदर्शन सोहळा संपन्न झाला. यंदाच्यावर्षी शवप्रदर्शन सोहळ्याला २१ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरूवात झाली होती आणि काल म्हणेजच ५ जानेवारी २०२५ रोजी अधिकृतरीत्या या सोहळ्याची सांगता झाली. संपूर्ण सोहळ्यात 82 लाख भाविकांनी शवदर्शन घेतले. कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांनी विशेष प्रार्थना घेऊन सोहळ्याच्या समाप्तीची घोषित केली.

यंदाचा सोहळा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांनी चर्च आणि सरकारकडून झालेल्या समन्वयाचे कौतुक केले. एकूण ४५ दिवस चाललेल्या प्रदर्शन सोहळ्यात फक्त देशच नाही तर परदेशातून देखील भाविकांनी येऊन पार्थिवाचे दर्शन घेतले.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन घेण्यासाठी अगदी शेवटच्या दिवशी देखील भाविक मोठ्या संख्येत जुने गोवा येथे पोहोचले. पवित्र अवशेष बासेलिकमध्ये नेण्यापूर्वी त्यांचे अखेर दर्शन व्हावे यासाठी देश आणि विदेशातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती.

आता पुढील शवप्रदर्शन सोहळा दहा वर्षानी म्हणजे २०३५ साली होणार आहे. यंदाचा शवप्रदर्शन सोहळा हा अनेकांसाठी पहिला अनुभव होता, त्यासाठी यूके आणि इतर ठिकाणी स्थायिक झालेले गोमंतकीय जुने गोवा येथे परतले आणि त्यांनी सेंट झेवियर यांच्या अवशेषांचे दर्शन घेतले. सुमारे एक हजार पोलिस शवप्रदर्शना निमित्त तैनात करण्यात आले होते, त्यात वॉच टॉवर, ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरा लावून कडक बंदोबस्त करण्यात आला होता. प्रदर्शनाच्या आयोजनात कुठलीही कमी राहणार नाही, याची खात्री सरकारकडून घेण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Weekly Horoscope: ऑगस्टचा हा आठवडा ठरणार 'लकी', 'या' 4 राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक स्थितीत होणार मोठा बदल

PM Viksit Bharat Rojgar Yojana: काय आहे ‘विकसित भारत रोजगार योजना’? तरुणांना कसे मिळणार 15,000 रुपये? PM मोदींची घोषणा

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

SCROLL FOR NEXT