Saint Francis Xavier Exposition: वीकेंडला जुने गोवे परिसर जातोय गजबजून, झेवियर शवदर्शन सोहळ्याला एक महिना पूर्ण; भाविकांची गर्दी ओसरेना

Saint Francis Xavier Exposition, Old Goa: जुने गोवे येथे २१ नोव्हेंबर रोजी सुरू झालेले सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शनाला जवळपास एक महिना पूर्ण होत आला तरी भाविकांची गर्दी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
Saint Francis Xavier Exposition: वीकेंडला जुने गोवे परिसर जातोय गजबजून, झेवियर शवदर्शन सोहळ्याला एक महिना पूर्ण; भाविकांची गर्दी ओसरेना
Old GoaDainik Gomantak
Published on
Updated on

तिसवाडी: जुने गोवे येथे २१ नोव्हेंबर रोजी सुरू झालेले सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शनाला जवळपास एक महिना पूर्ण होत आला तरी भाविकांची गर्दी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. वीकेंड आणि सुट्टीच्या दिवशी ही गर्दी उच्चांक गाठत आहे. मात्र त्‍यामुळे फेरीतील व्‍यापाऱ्यांची ‘चांदी’ होत आहे.

शवप्रदर्शन असल्याने यंदा फेरी ४५ दिवस असेल. यानिमित्ताने येणारे भाविक खरेदीसाठी फेरीत येतात. त्यात वीकेंडला गर्दीचे प्रमाण वाढते. त्यामुळे विक्रेते अशा दिवसांची आतुरतेने वाटत पाहत असतात. नेहमीच्या तुलनेत यंदा फेरी देखील भव्यदिव्‍य भरली आहे. मुख्य म्हणजे वीकेंड आणि सुट्टीच्या दिवशी केवळ भाविकच नाहीत तर फेरीत खरेदी करण्याच्या उद्देशानेच लोक घरातून बाहेर पडतात.

Saint Francis Xavier Exposition: वीकेंडला जुने गोवे परिसर जातोय गजबजून, झेवियर शवदर्शन सोहळ्याला एक महिना पूर्ण; भाविकांची गर्दी ओसरेना
Saint Francis Xavier Feast: खोटे देवदूत फिरतायंत, समाज फोडण्याचे काम करणाऱ्यांपासून लांब रहा : कार्डीनल लुईस आंतोनियो

पारंपरिक खाद्यपदार्थ जसे शेंगदाणे, खाजे इत्यादी दुकानांकडे ग्राहक आपोआप वळतात. कारण फेस्त किंवा शवप्रदर्शनाला गेलो आणि हे साहित्य आणले नाही तर वारी पूर्ण होत नाही अशी गोव्यातील पद्धत असल्याने या दुकानांना इतरांच्या तुलनेत जास्त ग्राहक (Customer) सहज भेटतात. खेळणी, घरगुती साहित्य, मोबाईलचे साहित्य, हॉटेल्स, कपडे आणि चपलांच्या दुकानांवरही मोठी गर्दी होत आहे.

Saint Francis Xavier Exposition: वीकेंडला जुने गोवे परिसर जातोय गजबजून, झेवियर शवदर्शन सोहळ्याला एक महिना पूर्ण; भाविकांची गर्दी ओसरेना
Saint Francis Xavier Feast: 'सायब'च गोव्याचं 'गोंयकारपण' वाचवू शकतात; सरदेसाईंची प्रार्थना

२४ नोव्हेंबर रोजी आम्ही दुकान थाटले. दरवर्षीप्रमाणे आम्ही येथे चणे आणि शेंगदाण्यांची विक्री करतो. यंदा शवप्रदर्शन असल्याने दीड महिना आमचा मुक्काम असणार आहे. सुरवातीला नोव्हेना आणि नंतर फेस्ताच्या काळात भाविकांची अलोट गर्दी उसळत होती. आता ही गर्दी वीकेंड आणि सुट्टीच्या दिवशी होत आहे.

- सनी व्‍ही., एक व्यावसायिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com