Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar: ते आले, पोलीस ठाण्यात गेले; 20 मिनिटात बाहेर पडले; सुभाष वेलिंगकरांच्या चौकशीच्या वेळी काय घडले?

Bicholim Crime News: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार वेलिंगकर यांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता डिचोली पोलिस स्थानकात उपस्थिती लावली.

गोमन्तक डिजिटल टीम

Saint Francis Xavier DNA Test Controversy Subhash Velingkar Case

डिचोली: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्‍या अवशेषांची डीएनए चाचणीची मागणी केल्याने अडचणीत सापडलेले सुभाष वेलिंगकर हे अखेर गुरुवारी दुपारी डिचोली पोलीस ठाण्यात हजर झाले. न्यायालयाच्या निर्देशानुसार ते पोलीस ठाण्यात पोहोचले आणि अवघ्या २० मिनिटांमध्येच ते पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले. पोलिस चौकशीत सहकार्य केल्यानंतर ते पोलीस ठाण्यातून निघाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार वेलिंगकर यांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता डिचोली पोलिस स्थानकात उपस्थिती लावली. पत्रकारांना चुकवीत ते मागच्या बाजूने पोलिस स्थानकात हजर झाले. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या उपस्थितीत बंद दाराआड वेलिंगकर यांची चौकशी करण्यात आली.

यावेळी डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्‍कर, पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर आणि तपास अधिकारी उपस्‍थित होते. जवळपास २० मिनिटे सुभाष वेलिंगकर यांची जबानी घेण्यात आली. वेलिंगकर यांनी नेमकी कोणती माहिती दिली ते मात्र कळू शकले नाही. चौकशी पूर्ण होताच सुभाष वेलिंगकर गाडीत बसून मार्गस्थ झाले. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पोलिस स्थानकाबाहेर जमले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

SCROLL FOR NEXT