Mohan Bhagwat RSS: सर्व भारतीयांचा डीएनए एकच ! संघ हे राष्ट्रभक्ती निर्माण करणारे संघटन -मोहन भागवत

Goa: पणजीतील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठे शक्तिप्रदर्शन करून गोव्यातून संघ संपलेला नाही, तर तो पुन्हा झेप घेऊ शकतो, हे दाखवून दिले.
RSS Sanghchalak Mohan Bhagawat | Mohan Bhagawat In Goa
RSS Sanghchalak Mohan Bhagawat | Mohan Bhagawat In Goa Dainik Gomantak

Mohan Bhagwat : जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत बाजूला ठेवून विविधतेत एकता घडवण्याचे काम महत्त्वाचे आहे. सर्व भारतीयांचा डीएनए एकच असून केवळ हिंदुस्थानातच शाश्‍वत सुख देण्याची ताकद आहे. भारत विश्‍वगुरू बनण्यासाठी आणि सर्वांगसुंदर समाज घडवण्यासाठी अविरत सेवेचे व्रत घ्यावे, असे आवाहन करत संघ अनुभवा, असा संदेश सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल पणजी येथे दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महासांघिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी पणजीत बौद्धिक दिले. या जाहीर सभेला संघासह त्यांच्या परिवारातील भाजप, विश्‍व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, बजरंग दल आदी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भागवत म्हणाले की, संघ हे राष्ट्रभक्ती निर्माण करणारे संघटन आहे.

मंत्री, आमदारांची उपस्थिती

महासांघिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्नीक उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुदिन ढवळीकर, विश्‍वजीत राणे, दिव्या राणे, रोहन खंवटे, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, नीळकंठ हळर्णकर, सभापती रमेश तवडकर, आमदार दिगंबर कामत, जीत आरोलकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, नरेंद्र सावईकर, उद्योगपती श्रीनिवास धेंपे, दत्तराज साळगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकांसाठी काय केले?

भ्रष्ट नेत्यांना कानपिचक्या देताना भागवत म्हणाले, जसा समाज आहे, तसे त्या त्या देशाला नेते मिळाले आहेत. ‘यथा राजा, तथा प्रजा’ या नियमानुसार आमची भाषा, पेहराव भिन्न असले, तरी आपण सगळे एक आहोत.

‘तुम्ही किती संपत्ती जमा केली, तुम्ही राजकारणात किती सामर्थ्यशाली झालात हे महत्त्वाचे नाही. तुम्ही तळागाळातील लोकांसाठी त्या संपत्तीचा-सामर्थ्याचा उपयोग केला का? त्यांचा विकास केला का? हे महत्त्वाचे आहे,’ असे सरसंघचालक म्हणाले.

RSS Sanghchalak Mohan Bhagawat | Mohan Bhagawat In Goa
Mahadayi Water Dispute: आता म्हादईचा लढा रस्त्यावर येतोय!

पणजीतील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठे शक्तिप्रदर्शन करून गोव्यातून संघ संपलेला नाही, तर तो पुन्हा झेप घेऊ शकतो, हे दाखवून दिले.

मोठ्या संख्येने संघ कार्यकर्ते उपस्थित असलेल्या सभेत भागवत यांनी राजकीय नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या व भाजप जरी सत्तेवर येण्यासाठी भ्रष्ट नेत्यांना पावन करून घेत असला, तरी या नेत्यांना शिस्तीने व प्रामाणिकपणे काम करावे लागेल, असा नवा मंत्र त्यांनी दिला.

निसर्ग राखा!

हिंदू धर्मप्रणालीत देव, पितृ आणि ऋषीऋण मानले आहे. त्यामुळे विकास करताना पर्यावरणाला मित्रत्वाचा दर्जा देऊन सृष्टीची जोपासना करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत एका अर्थाने पर्यावरणाचा संहार करणाऱ्यांवर सरसंघचालकांनी आसूड ओढले. आपण करत असलेल्या कमाईतून परतीचे ऋण देणे आहे, हेही सर्वांनी लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com