Sai Pallavi In IFFI Dainik Gomantak
गोवा

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

Sai Pallavi In IFFI: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि साध्या व्यक्तिमत्त्वाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Sameer Amunekar

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि साध्या व्यक्तिमत्त्वाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नैसर्गिक सौंदर्य, मृदू हास्य आणि वास्तववादी भूमिका यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिनं गोवा येथे 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली असून, तिच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

साधेपणा आणि पारंपरिक लूकसाठी ओळखली जाणारी साई पल्लवी यावेळीही आपल्या खास अंदाजात दिसली. नेहमीप्रमाणे साडी आणि मिनिमल मेकअपमध्ये ती मंचावर अवतरली होती. तिच्या या लूकचे उपस्थितांनी तसेच सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रचंड कौतुक केले. ग्लॅमरच्या झगमगाटापेक्षा नैसर्गिकतेला प्राधान्य देणारी अभिनेत्री म्हणून तिची वेगळी ओळख आहे.

गोव्यातील 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची यंदा दणक्यात सुरुवात झाली. गुरुवारी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत एकूण 23 चित्ररथ सहभागी झाले असून, त्यांची रचना भारतीय कला, संस्कृती आणि चित्रपटसृष्टीचे वैभव अधोरेखित करणारी होती.

या मिरवणुकीत गोव्याच्या परंपरा आणि स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे 11 चित्ररथ विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक नृत्यप्रकार, ऐतिहासिक वास्तू, स्थानिक उत्सव आणि जीवनशैली यांचे सुंदर सादरीकरण या चित्ररथांमधून करण्यात आले. गोमंतकीय कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

या संपूर्ण महोत्सवात साई पल्लवीसारख्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिक प्रतिष्ठा मिळाली. भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरव आणि गोव्याचा सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर मांडण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरत असून, चित्रपटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT