Goa Waterfall  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Tourism: हा धबधबा घालतोय लोकांना भुरळ!

Bicholim: डिचोली शहराला जोडून असलेला धबधबा खळखळून वाहत असून, पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी गर्दी उसळत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली शहराला जोडून असलेला ‘धबधबा’ खळखळून वाहत असून, पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी गर्दी उसळत आहे. डिचोली शहरात येणाऱ्या आणि सारमानस रस्त्याच्या बाजूने असलेल्या हा धबधबा सध्या लोकांना भुरळ घालत आहे.

बुडण्याच्या दुर्दैवी घटनांची गंभीर दखल घेत, सरकारने धोकादायक धबधब्यांवरील पर्यटनावर बंदी घातली असली, तरी डिचोलीतील हा धबधबा आंघोळीसाठी सुरक्षित असल्यामुळे या धबधब्यावर पर्यटकांसह मुलेही आंघोळीची मजा लुटत असतात. स्थानिकांसह वेगवेगळ्या भागातून पर्यटक धबधब्यावर वर्षा पर्यटनासाठी येतात. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची गर्दी होत असते.

डिचोलीहून सारमानसच्या दिशेने जाताना उजव्या बाजूने रस्त्याला टेकूनच धबधबा आहे. डोंगराळ भागातून वाहणारा हा धबधबा प्रत्येकाला आकर्षित करून वेड लावत असतो. या धबधब्यावरूनच तेथील वाड्याला ‘धबधबा’ या नावाने ओळखण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे हा धबधबा आता खळखळून वाहत आहे.

रविवारी आणि अन्य सुट्टीच्या दिवशी तर डिचोलीबाहेरचे लोक या धबधब्यावर मजा लुटण्यासाठी येतात. निसर्गप्रेमीही या धबधब्याचे निसर्गसौंदर्य न्याहाळण्याची संधी सोडत नाहीत. हा धबधबा देवस्थान परिसरात येत असल्याने धबधब्यावर मद्यप्राशन, मांसाहारी खाद्यपदार्थ वर्ज्य आहेत. असे प्रकार घडू नयेत म्हणून स्थानिकही त्याकडे लक्ष ठेवून असतात.

अनुचित घटना नाही!

डिचोलीतील मये, लाडफे आदी काही भागांत पावसाळ्यात धबधबे कोसळू लागतात. अन्य धबधब्यांच्या तुलनेत शहरातील हा धबधबा सुरक्षित असा आहे. धार्मिक महत्त्व असलेला डिचोलीतील धबधबा आंघोळ करण्यासाठी आणि वर्षा पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दरवर्षी या धबधब्यावर गर्दी होत असते. आतापर्यंत तरी या धबधब्यावर कोणतीच अनुचित घटना घडलेली नाही, अशी माहिती स्थानिक सुरेश नारुलकर यांनी दिली.

धबधब्याच्या मागच्या बाजूने मये तलाव आहे. पूर्वी हा धबधबा बारमाही वाहत होता. मात्र, खाण व्यवसायामुळे उन्हाळ्यात या धबधब्याच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. हा धबधबा सुरक्षित आहे. डिचोली शहराचे वैभव असलेल्या या धबधब्याचे संवर्धन व्हावे. या धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
प्रकाश न्हावेलकर, स्थानिक नागरिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT