Sadanand Tanavade, Dovorlim Railway Flyover X
गोवा

Dovorlim Flyover: 'दवर्ली उड्डाणपूल झाला तर लोकांचा त्रास कमी होईल', तानावडेंची प्रतिक्रीया; मुख्यमंत्र्यांना करणार पाहणीची विनंती

Sadanand Tanavade: हा एक मोठा प्रकल्प असल्याने राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्राला जाणे व त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांना सांगितले.

Sameer Panditrao

सासष्टी: आपण दवर्ली रेल्वे उड्डाणपुलासंदर्भात राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला, पण येथे येऊन या जागेची प्रत्यक्ष पाहणी करणे आपल्याला गरजेचे वाटले. आज आपण दवर्ली उड्डाणपुलासाठीच्या परिसराचा आढावा घेतला. येथील रेल्वे उड्डाणपूल हा लहान सहान नसून त्यासाठी मोठी जागा लागेल.

हा एक मोठा प्रकल्प असल्याने राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्राला जाणे व त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज पत्रकारांना सांगितले.

त्यांच्यासमवेत नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, दवर्लीचे सरपंच साईश राजाध्यक्ष पंच हेर्कुलान नियासो, विजय सुरमे आदी उपस्थित होते. हा पूल अत्यंत आवश्यक आहे. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूल हवाच याबद्दल कोणाचेही दुमत नसेल. दर दिवशी ८२ वेळा हे रेल्वे फाटक बंद केले जाते. त्यामुळे लोकांना, खास करून विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. जर येथे उड्डाणपूल झाला, तर लोकांचे त्रास कितीतरी पटीने कमी होतील, असेही तानावडे यांनी सांगितले.

ही जागा सपाट असल्याने व रस्ता अरुंद असल्याने आणखी जागा संपादन करावी लागेल. इलेक्ट्रीक रेल्वे गाड्यांसाठी वीजवाहिनी असल्याने पुलाला उंची द्यावी लागेल. त्यामुळे हा जास्त खर्चिक प्रकल्प असेल.

या उड्डाणपुलासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शिवाय त्यांना येथे आमंत्रित करून पाहणी करण्याची विनंती करणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT