Sadanand Shet Tanavade X
गोवा

Goa BJP : 'भाजपा'त नवीन चेहरे पाहायला मिळतील! मंडळ अध्यक्ष निवडीवरून तानावडेंचे सूतोवाच

BJP Goa State President Selection: सदानंद शेट तानावडे म्हणाले की, मंडळ अध्यक्षपदी आता ४५वर्षाहून अधिक वयाचा कार्यकर्ता नियुक्त करता येणार नाही. तर जिल्हा अध्यक्ष हा ६० वर्षांहून वरचा नसेल.

Sameer Panditrao

Goa BJP State President Selection Meeting

म्हापसा: भाजपमध्ये आता मंडळ अध्यक्षांसाठी ४५वर्षे कमाल वयोमर्यादेची अट लागू झाली आहे. त्यानुसार, मंडळ अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी (ता.२) म्हापसा येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात उत्तरेतील मतदारसंघांतील लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची प्रदेशाध्यक्षांनी ‘वन-टू-वन’ बैठक घेत चर्चा केली. येत्या ३ ते ६ जानेवारी यादरम्यान, मंडळ अध्यक्षाची निवड होईल.

याविषयी माध्यमांशी बोलताना राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, मंडळ अध्यक्षपदी आता ४५वर्षाहून अधिक वयाचा कार्यकर्ता नियुक्त करता येणार नाही. तर जिल्हा अध्यक्ष हा ६० वर्षांहून वरचा नसेल. याच पार्श्वभूमीवर सध्या भाजपात संघटनात्मक बदल व नवीन चेहरे पाहायला मिळतील.

आज उत्तरेतील सर्व मतदारसंघातील आमदार, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या ३ ते ६ जानेवारी या दरम्यान, मंडळ अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडेल. तानावडे म्हणाले की, सर्वच मतदारसंघातून सर्वांनुमते मंडळ अध्यक्षपदासाठी नावांवर चर्चा झाली. काही मतदारसंघांत ३ रोजी नामांकन व दुसऱ्या दिवशी नवीन अध्यक्षाची नावे जाहीर केली जातील.

दरम्यान, मडगाव भाजप मंडळाच्या अध्यक्षपदासाठी योगिराज कामत, माजी नगरसेवक दामू नाईक सह अभिषेक काकोडकर व गौरव नार्वेकर यांची शिफारस झाल्याचे कळते. यावेळी नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, दामू नाईक, गोविंद पर्वतकर, प्रेमानंद म्हांबरे, संजू देसाई हे या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT