Goa Politics: राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांना गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची खरचं ऑफर होती का? त्यांनीच केले स्पष्ट

Goa Politics Latest News: गोव्याप्रमाणे केरळ देखील माझाच आहे. मी तिथे कुणाला शिकवायला किंवा आज्ञा द्यायला चाललो नाही.
Goa Politics: राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांना गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची खरचं ऑफर होती का? त्यांनीच केले स्पष्ट
Governor Designate of Kerala rajendra arlekar met Governor of GoaDIP Goa
Published on
Updated on

पणजी: 'मला गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची कोणतीही ऑफर नव्हती, तसेच गोव्यातील कोणत्याही राजकीय पदाच्या स्पर्धेत मी नव्हतो आणि नाही. या सर्व अफवा आहेत', असा पुनरुच्चार केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केला.

आर्लेकर यांनी आज (०१ जानेवारी २०२५) गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन केरळ राज्यात जबाबदारी सांभाळण्यापूर्वी विविध विषयांवर चर्चा केली.

Goa Politics: राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांना गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची खरचं ऑफर होती का? त्यांनीच केले स्पष्ट
Goa Cabinet Reshuffle: नव्या वर्षात गोवा मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचे सूचक वक्तव्य

समाज माध्यमांशी संवाद साधताना राज्यपाल आर्लेकर म्हणाले- राज्यपाल पिल्लई हे मूळचे केरळचे असल्याने मी त्यांच्यासोबत केरळसंदर्भात चर्चा केली. राज्यपाल या नात्याने त्यांचे गोव्यातील विविध घटनांकडे लक्ष आहे; मात्र त्यावर मी टिप्पणी करणे गरजेचे नाही. आम्ही गोव्यातील अन्य कोणत्याही गोष्टींची चर्चा केली नाही.

सरकारला मदत करणार

राज्यपाल पिल्लई हे माझे चांगले मित्र आहेत व ते स्वतःच केरळचे असल्याने त्यांच्याकडून मी केरळ राज्यातील विकासाबाबत माहिती घेतली. तेथील विविध गोष्टींबद्दल त्यांची मते जाणून घेतली. गोव्याप्रमाणे केरळात देखील पर्यटन क्षेत्र विकसित झाले आहे.

पिल्लई यांनी मला केरळमधील पर्यटन आणि अर्थव्यवस्था यांची माहिती दिली. गोव्याप्रमाणे केरळ देखील माझाच आहे. मी तिथे कुणाला शिकवायला किंवा आज्ञा द्यायला चाललो नाही. तेथील सरकारला त्यांच्या कामात मदत करण्यास मी चाललो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com