Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election 2027: भाजप-मगोप युतीचेच सरकार राज्यात पुन्हा येणार, सदानंद शेट तानावडेंनी व्यक्त केला विश्वास; विकासाला मिळणार नवी गती

Sadanand Shet Tanavade Goa: पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरी या राज्यांमधील निवडणुकीत भाजपला ज्याप्रकारे बहुमत मिळाले, ते पाहता लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरी या राज्यांमधील निवडणुकीत भाजपला ज्याप्रकारे बहुमत मिळाले, ते पाहता लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, हे स्पष्ट होत आहे. अशा स्थितीत २०२७ च्या गोव्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप व मगोप युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.

रवींद्र भवनातील एका कार्यक्रमासाठी तानावडे आले होते. ते म्हणाले, भाजप-मगोप युती ही केंद्रातून झाली आहे. या घडीला युती आहे. त्यामुळेच भाजप-मगोप युतीचेच सरकार गोव्यात स्थापन होईल, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालात तीनवेळा सरकार होते. मात्र, या काळात तिथे अनेक अत्याचार झाले. आयुष्यमान भारत, पंतप्रधान आवाससारख्या केंद्रीय योजनासुद्धा लोकांपर्यंत पोचविल्या नाहीत. बंगालात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले. त्यामुळे बंगालमधील सर्व लोक एकत्र आले व त्यांनी ममतांना धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया तानावडे यांनी व्यक्त केली.

निवडणूक फेब्रुवारी २०२७ मध्येच

तानावडे म्हणाले, की जरी डिसेंबर २०२६ मध्ये गोव्यात विधानसभा निवडणुका होतील असे म्हटले जात असले, तरी ते शक्य नाही. निवडणूक फेब्रुवारी २०२७ मध्येच होईल. गोव्यासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पूर्वांचलमधील राज्ये, पंजाब या राज्यांतीलही निवडणुका होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT