Sadanand Shet Tanavade
Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

Sadanand Shet Tanavade : भाजपमध्‍येच होतो म्हणून खासदार पर्यंत पोहोचलो...

गोमन्तक डिजिटल टीम

Sadanand Shet Tanavade : माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या कार्यकर्त्याची देखील भारतीय जनता पक्षात कदर केली जाते. सामान्‍य कार्यकर्त्याला नेता बनविले जाते. भाजपमध्‍ये होतो म्हणूनच मी पंच ते खासदारकीपर्यंत मजल मारू शकलो.

गोव्यातून मला बिनविरोध खासदार होण्याचा मान दिल्याबद्दल सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचेही मी आभार मानतो, असे प्रतिपादन राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले.

गोमन्तक टीव्हीवर संपादक-संचालक राजू नायक यांनी तानावडे यांची खास मुलाखत घेतली. खासदारकीसाठी इतर काही नावे पाठवायची असल्यास किंवा अन्‍य कोणाला संधी द्यायची असल्यास माझी हरकत नसल्याचे मी पक्षातील स्थानिक नेत्यांना सांगितले होते.

परंतु पक्षातून तसेच सर्व स्तरांतून ज्या प्रकारे मला समर्थन प्राप्त झाले, ते पाहून मी अतिशय समाधानी असल्याचे तानावडे यांनी सांगितले.

चंद्रशेखर घेताहेत आढावा

गेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील १६१ जागांवर भाजपचे उमेदवार १० हजारांहून कमी मतांनी पराभूत झाले. अशा मतदारसंघाचा केंद्रीय भाजप नेतृत्व सर्व्हे करत आहेत. दक्षिण गोवा मतदारसंघाची जबाबदारी राजीव चंद्रशेखर यांच्‍याकडे देण्यात आली आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान उमेदवार कोण ते ठरेल. दरम्‍यान, खासदार विनय तेंडुलकर यांनी राज्यसभेत अनेकदा तारांकित-अतारांकित प्रश्‍न विचारले.

त्यांनी आपल्‍या खासदारकीला न्याय दिला. तेंडुलकर आणि माझी मैत्री फार जुनी आहे. ती आजही कायम आहे, असे तानावडे म्‍हणाले.

पक्षाच्‍या विचारांना मुख्‍यमंत्र्यांचे प्राधान्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पाय आजही जमिनीवर आहेत. सर्वांशी ते आजही तितक्याच आपुलकीने वागतात. सदाच कार्यकर्त्यांच्‍या संपर्कात असतात. जेव्‍हा मुख्यमंत्री म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतात, तेव्‍हा ते तसे निर्णय घेतातच. सरकारच्या सर्वच कामकाजात पक्षीय संघटनेचा हस्तक्षेप असतोच असे नाही.

परंतु पक्षीय धोरण हे असतेच. मुख्‍यमंत्री सावंत हे पक्षाचे विचार सोबत घेऊन कार्य करणारे आहेत. त्‍यामुळे पक्षीय संघटना आणि सरकारमध्ये कोणतेच मतभेद नसल्याचे तानावडे यांनी सांगितले.

भाजपमध्‍ये नव्याने समाविष्ट झालेल्या आमदारांना पक्षप्रवेश देण्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा निश्‍चितच सहभाग आहे, परंतु कोणाला मंत्रिपद द्यावे, तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्‍याबाबत निर्णय घेण्‍यात ते सक्षम असल्याचे तानावडे यांनी सांगितले.

पक्षाची तत्त्वे कधीच सोडली नाहीत

विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांना भाजपमध्‍ये घेतले. सत्ता हवी असेल, विधानसभेत आपले विचार मांडायचे असतील तर काही वेळा कठोर निर्णय हे घ्यावेच लागतात. परंतु आम्ही नव्याने सामावून घेतलेल्या आमदारांना पक्षाची तत्त्वे, ध्येयधोरणांवर अंमल करायला लावले. पक्षाची तत्त्वे कधीच सोडली नाहीत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेते पक्षाला सोडून गेले, परंतु कार्यकर्ता आम्हाला सोडून गेला असे कधीच घडले नाही. जे नेते पक्ष सोडून गेले त्यांना समजावण्‍यात प्रदेशाध्यक्ष म्हणून मी कुठेतरी कमी पडलो, अशी खंत तानावडे यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत आम्‍ही दक्षिण गोव्याची जागा जिंकूच, त्यात शंकाच नाही. मागील निवडणुकीत अवघ्या ९ हजार मतांनी आमचा उमेदवार पराभूत झाला होता. त्यावेळी आमच्यासोबत मगो पक्ष नव्हता. परंतु आता मगोसह ज्‍येष्‍ठ नेते रवी नाईक, दिगंबर कामत, चंद्रकांत कवळेकर आहेत. त्‍यामुळे दक्षिण गोव्याची खासदारकी आम्‍ही निश्‍चितच जिंकू.

सदानंद शेट तानावडे, नवनिर्वाचित राज्यसभा खासदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: कोर्टाचा सख्त आदेश; घरमालकांनीच मोडली बेकायदेशीर घरे

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

Margao: कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम

Pakistan Car Blast: पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ मोठा कार स्फोट; माजी खासदारासह 4 जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT