Goa Government: अंत्योदय लाभार्थ्यांना मिळणार गॅस सिलिंडरसाठी अनुदान; बँक खात्यात जमा होणार 'एवढी' रक्कम

मुख्यमंत्री : एलपीजी गॅस सिलिंडर योजना अधिसूचित
Subsidy For Gas Cylinder
Subsidy For Gas Cylinder Dainik Gomantak

Subsidy For Gas Cylinder अंत्योदय अन्न योजनेखालील (एएवाय) रेशनकार्डधारकांना प्रत्येक महिन्याला गॅस सिलिंडरसाठी 275 रुपये राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे.

त्यासंदर्भात सरकारने मुख्यमंत्री एलपीजी गॅस सिलिंडर योजना अधिसूचित केल्यानंतर नागरी पुरवठा खात्याने अधिसूचना जारी केली आहे. एएवाय योजनेखाली राज्यात सुमारे 11,550 रेशनकार्डधारक आहेत. त्यांना या योजनेमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

Subsidy For Gas Cylinder
Goa Petrol-Diesel Price: आजचे इंधनाचे दर अपडेट, जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव

गेल्या काही वर्षांत एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सामान्य लोकांचे बरेच हाल झाले आहेत. सध्या या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १,१२० रुपये आहे. त्यामुळे गरिबांना हा सिलींडर विकत घेणे मुष्किलीचे होते.

सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर त्यात सुधारणा करत ती फक्त एएवाय रेशनकार्डधारकांनाच दिली जाईल, असे स्पष्टीकरण दिले. यावरून विरोधकांनीही सरकार टीकेची झोड उठविली होती.

Subsidy For Gas Cylinder
Goa Assembly Monsoon Session: कला अकादमीनंतर क्रीडा स्पर्धेवरुन विरोधकांनी सरकारला घेरले

सरकारने एएवाय योजनेखालील रेशनकार्डधारकांना सिलींडरची वाढलेली किंमत लक्षात घेत त्यांना त्यात आधार देण्यासाठी दरमहा 275 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यावर-

या योजनेअंतर्गत एएवाय रेशनकार्डवरील कुटुंबप्रमुखाच्या अधिकृत बँक खात्यात ही रक्कम सरकार थेट जमा करणार आहे.

ही योजना एक वर्षासाठी लागू असेल, असे नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. या योजनेचा लाभ सुमारे ११,५५० रेशनकार्डधारकांना मिळणार असल्याने सरकारच्या तिजोरीवर दरमहा ३१.७६ लाखांचा बोजा पडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com