काणकोण: भारतीय संघाचा माजी स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शुक्रवारी (ता. २२) काणकोणला भेट दिली. चाररस्ता येथील सेंत्रो प्रोमोतर द इस्त्रुसांव संस्थेच्या श्री मल्लिकार्जुन विद्यालय व संलग्न शैक्षणिक शाखांच्या बहुउद्देशीय क्रीडांगण सभागृहाचे उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
उद्घाटन समारंभाला स्थानिक विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. क्रीडांगणाच्या उद्घाटनानंतर सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अनुभवांबद्दल चर्चा केली आणि क्रीडा व शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले. सचिनने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत सांगितले की, क्रिकेट माझी आवड, व्यवसाय नाही'.
सचिन तेंडुलकरला ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखलं जातं. त्याच्या कारकिर्दीतील अनेक विक्रम आजही क्रिकेटविश्वात तेजाने चमकत आहेत. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळविणारे ते एकमेव क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या हस्ते ‘क्रीडा आंगण’ चे उद्घाटन होणे ही केवळ शैक्षणिक संस्थेसाठीच नव्हे, तर काणकोणवासीयांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.
सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २०० कसोटी आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, जो स्वतःच एक जागतिक विक्रम आहे. सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने २०० कसोटी सामने खेळले आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी त्याचा विक्रम मोडणे सोपे होणार नाही. सध्या असा कोणताही फलंदाज नाही जो २०० कसोटी किंवा ४६३ एकदिवसीय सामने खेळू शकेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.