Sachin Pilgaonkar  Dainik Gomantak
गोवा

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकरांना गोव्यातील 'या' गावात बांधायचयं हक्काचं घर, काय आहे भावनिक कारण?

Sachin Pilgaonkar Goa House: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी गोमंतकीय रसिकांना एक सुखद धक्का दिला आहे.

Manish Jadhav

पणजी: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी गोमंतकीय रसिकांना एक सुखद धक्का दिला आहे. आपल्या नावातील 'पिळगावकर' या आडनावाचे मूळ ज्या गावात आहे, त्या पिळगाव (डिचोली) येथे आपण लवकरच घर बांधणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पणजीतील कांपाल येथील बांदोडकर मैदानात आयोजित 'पुस्तकोत्सव' या सोहळ्यात ते बोलत होते.

या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सचिन पिळगावकर यांनी विशेष उपस्थिती लावली होती. प्रसिद्ध सूत्रसंचालक अमित भाटिया यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद केवळ साहित्यावर मर्यादित न राहता, सचिनजींच्या आयुष्यातील अनेक अनपेक्षित वळणांचा साक्षीदार ठरला. सुमारे दीड तास चाललेल्या या गप्पांच्या मैफलीत सचिन यांनी आपल्या 'पिळगाव' या गावाशी असलेल्या भावनिक नात्याला उजाळा दिला.

पिळगावात घर आणि गोमंतकीय कलाकारांसह चित्रपट

"पिळगाव हे माझे मूळ गाव आहे आणि तिथल्या मातीशी माझे नाते अतूट आहे. त्यामुळेच आता पिळगावात स्वतःचे घर बांधण्याचा माझा मानस आहे," असे सचिन यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. केवळ घरच नाही, तर आगामी काळात गोमंतकीय स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन एक चित्रपट करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. गोव्यातील कलाकारांमध्ये असलेली उपजत प्रतिभा जागतिक स्तरावर नेण्याची त्यांची जिद्द यातून दिसून आली.

'बनवाबनवी'चा सिक्वेल आणि AI चा वापर

मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी एक मोठी बातमी दिली. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर करुन 'बनवाबनवी'चा पुढचा भाग किंवा त्या धर्तीवर काहीतरी नवीन करण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या महान कलाकाराला पडद्यावर पुन्हा अनुभवता येईल का, अशी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

लक्ष्याबद्दलच्या आठवणींनी सचिन हळवे

आपला जवळचा मित्र आणि पडद्यावरील जोडीदार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल बोलताना सचिन भावूक झाले. "लक्ष्या हा एक उत्कृष्ट कलाकार होताच, पण माणूस म्हणून तो दहापटीने श्रेष्ठ होता," अशा शब्दांत त्यांनी आपल्या मित्राप्रती आदर व्यक्त केला. त्यांच्या मैत्रीतील अनेक किस्से ऐकताना रसिक प्रेक्षकही काही काळ त्या सुवर्णकाळात हरवून गेले होते.

'हाच माझा मार्ग' पुस्तकाची तिसरी आवृत्ती

सचिन पिळगावकर यांच्या 'हाच माझा मार्ग' या आत्मचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीबद्दलही यावेळी चर्चा झाली. "मी प्रत्येक आवृत्तीमध्ये काही अतिरिक्त माहिती आणि नवीन अनुभव जोडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ज्यांनी हे पुस्तक आधी वाचले आहे, त्यांनाही तिसऱ्या आवृत्तीत काहीतरी नवीन वाचायला मिळेल," असे त्यांनी नमूद केले.

साडेचार वर्षांच्या वयात मिळालेल्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारापासून ते आजवरच्या प्रवासातील अनेक पैलू या पुस्तकात उलगडण्यात आले आहेत. कार्यक्रमाची सांगता 'नदिया के पार'मधील अजरामर गीत ‘कौन दिसा मे लेके चला रे बटोहिया‘ याने झाली. सचिनजींच्या सुश्राव्य स्वरांनी बांदोडकर मैदानावर एक वेगळीच जादू निर्माण केली होती. दीड तासांहून अधिक काळ चाललेल्या या संवादाने गोव्यातील (Goa) रसिक तृप्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT