E Rickshaw Crash Test Rating Rules: आता ई-रिक्षांनाही मिळणार सेफ्टी स्टार रेटिंग! मोदी सरकारचा मास्टरप्लॅन तयार; लवकरच जाहीर होणार नवे नियम

Nitin Gadkari E Rickshaw Safety Norms Bharat Ncap: देशात रस्त्यांवर वाढलेली ई-रिक्षांची गर्दी आणि त्यातून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मोदी सरकारने आता कडक पावले उचलली आहेत.
Nitin Gadkari E Rickshaw Safety Norms Bharat Ncap
PM ModiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Nitin Gadkari E Rickshaw Safety Norms Bharat Ncap: देशात रस्त्यांवर वाढलेली ई-रिक्षांची गर्दी आणि त्यातून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी मोदी सरकारने आता कडक पावले उचलली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली असून, प्रवासी कारच्या क्रॅश टेस्ट प्रणालीप्रमाणेच म्हणजेच ‘भारत एनसीएपी’च्या धर्तीवर आता ई-रिक्षांसाठीही कठोर सुरक्षा नियम लागू केले जाणार आहेत. सरकार या संदर्भात एक ठोस कृती आराखडा तयार करत असून, लवकरच ई-रिक्षांची सुरक्षितता तपासण्यासाठी नवे निकष निश्चित केले जाणार आहेत.

भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या जेआरडी टाटा पुरस्कार 2026 सोहळ्यात बोलताना गडकरी यांनी देशातील रस्ते अपघातांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख रस्ते अपघात होतात आणि त्यामध्ये जवळपास एक लाख 80 हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो, अशी आकडेवारी त्यांनी मांडली. सर्वसामान्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने 2023 मध्ये सुरु झालेल्या ‘भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम’अंतर्गत कारची धडक चाचणी घेऊन त्यांना एक ते पाच स्टारपर्यंत रेटिंग दिले जाते.

Nitin Gadkari E Rickshaw Safety Norms Bharat Ncap
PM Kisan Yojana 24th Installment Released: 9.34 कोटी शेतकऱ्यांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! पीएम किसानचा 24वा हप्ता जारी; स्टेटस तपासा

आता हाच निकष ई-रिक्षांनाही लावण्याची तयारी सुरु असल्याने बाजारात विकल्या जाणाऱ्या असुरक्षित ई-रिक्षांना चाप बसणार असून प्रवाशांचा (Passengers) जीव धोक्यात येणार नाही.

Nitin Gadkari E Rickshaw Safety Norms Bharat Ncap
PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! 30 ऑक्टोबरला जमा होणार पीएम किसानचा 24वा हप्ता, पण 'या' 5 चुकांमुळे अडकू शकतात तुमचे 2,000 रुपये

याच कार्यक्रमात गडकरींनी भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राच्या भविष्याचा मोठा आराखडाही सादर केला. येत्या पाच वर्षांत भारतीय वाहन उद्योगाला जगात पहिल्या क्रमांकावर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरींनी पदभार स्वीकारला तेव्हा या क्षेत्राची उलाढाल 14 लाख कोटी रुपये होती, जी आज वाढून 22 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. सध्या 78 लाख कोटी रुपयांसह अमेरिका पहिल्या, 47 लाख कोटी रुपयांसह चीन दुसऱ्या, तर भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.