New revelations about Russian woman living in Goa and Gokarna Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील गुहेत दिला बाळाला जन्म, गोकर्णच्या जंगलात केले वास्तव्य; पती आहे उद्योगपती; ‘त्या’ रशियन महिलेबाबत नवीन खुलासा

Russian woman Gokarna forest: विभागीय विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने सध्या महिलेला ताब्यात घेतले असून, तिला माघारी पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Pramod Yadav

रशियन महिलेच्या या बातमीबाबत थोडक्यात माहिती

१) गोकर्ण येथील घटनदाट जंगलात असलेल्या एका गुहेत रशियन महिला तिच्या दोन मुलांसोबत राहत असल्याचे आढळून आले.

२) या रशियन महिलेचा पती उद्योगपती असल्याचे समोर आले असून, तिला आणखी एक मुल असल्याचे समोर आले आहे.

३) महिलेच्या व्हिसा मुदतीबाबत आणखी माहिती समोर आली आहे.

कर्नाटक: रशियन महिला तिच्या दोन लहान मुलींसह कर्नाटकातील गोकर्ण येथील गुहेत आढळून आली. धोकादायक जंगलात विदेशी महिला अशाप्रकारे आढळून आल्याने खळबळ निर्माण झालीय. याप्रकरणी आता आणखी नवी माहिती समोर आली आहे.

महिला गोव्यात देखील एका गुहेत वास्तव्य करत आणि तिथेच तिने बाळाला जन्म दिला होता. एवढेच नव्हे तर तिचा पती इस्त्रायल येथील मोठ्या उद्योगपती असल्याची देखील माहिती समोर आली आहे. निना कुटीना (४०) असे या महिलेचे नाव आहे.

इंडीयन एक्सप्रेसने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, विभागीय विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने सध्या महिलेला ताब्यात घेतले असून, तिला माघारी पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

रशियन महिलेचा व्हिसा २०१७ साली समाप्त झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, महिलेने हे सत्य नसल्याचे सांगताना काही दिवसांपूर्वी व्हिसा संपल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले. यापूर्वी महिलेने चार विविध देशात प्रवास करुन माघारी आल्याचेही सांगितले.

पतीबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिलेल्या निनाने तिचा पती उद्योगपती असल्याचे सांगितले. ४० वर्षीय पतीसोबत गेल्या काही वर्षापूर्वी भेट झाली व पुढे दोघांमध्ये प्रेम झाल्याचे तिने सांगितले. निना यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी तिच्या पतीला संपर्क साध्यल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या आठवड्यात गोकर्ण येथील घनदाट जंगलात एका गुहेत रशियन महिला राहत असल्याचे आढळून आले होते. धक्कादायक बाब म्हणजे महिलेसोबत तिच्या दोन लहान मुलीदेखील आढळून आल्या होत्या. आध्यात्मिक ओढीतून तिने हे पाऊल उचलले असल्याचे उघड झाले होते. महिलेला गुहेत राहण्याचा मोठा अनुभव असल्याचे देखील तिने सांगितले होते.

इतकेच काय माझी मुले एकदम सुरक्षित असून, त्यांना देखील गुहेत राहण्यास आवडते. गेल्या काही वर्षात २० देशांतील जंगलात वास्तव्य केल्याचे देखील तिने सांगितले. निनाचे आणखी एक बाळ रशियात असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

प्रश्न: रशियन महिला कर्नाटकमध्ये कुठे राहत होती?

उत्तर: ४० वर्षीय रशियन महिला गोकर्ण - कर्नाटक येथील जंगलात एका गुहेत राहत होती

प्रश्न: रशियन महिला गुहेत का राहत होती?

उत्तर: निना कुटीना या महिलेला आध्यात्म आणि योगाची आवड होती. त्यामुळे तिने गुहेत राहण्याचा निर्णय घेतला होता.

प्रश्न: गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा शोध कसा लागला?

उत्तर: कर्नाटक पोलिस दरडप्रवण भागाची पाहणी करत असताना गुहेच्या बाहेरचे कपडे पाहून महिलेचा शोध लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi: म्हादईच्या पुरामुळे सोनाळ-तार येथील रस्ता जलमय, गावकऱ्यांचे होतायत हाल; रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी

Bison Attack Goa: गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, बोणये-सावईवेरे परिसरातील डोंगर भागात हैदोस वाढला

Numerology Prediction: शनि आणि गुरूचा प्रभाव मिळवून देईल मोठा लाभ; गुरुवारचा दिवस 'या' मूलांकांसाठी ठरणार खास

Goa: 28 फेब्रुवारी 2014 पूर्वी बांधलेली घरं होणार कायदेशीर! राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Russian Woman: 'त्या' रशियन महिलेचे गोव्यातही वास्तव्य, गुहेत दिला बाळाला जन्म; पती उद्योगपती असल्याचीही माहिती, अनेक खुलासे समोर

SCROLL FOR NEXT