Russian tourist murder Goa Dainik Gomantak
गोवा

'त्या' रशियन पर्यटकाने केले 15 खून? सीरियल किलरने उडविली गोवा पोलिसांची झोप; संशयिताला 14 दिवसांची पोलिस कोठडी

Russian tourist murder Goa: दोन रशियन युवतींच्या खूनप्रकरणी अटक केलेला रशियन पर्यटक आलेक्सेई लिओनोव याने आतापर्यंत १५ युवतींचा खून केल्याची जबानी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: दोन रशियन युवतींच्या खूनप्रकरणी अटक केलेला रशियन पर्यटक आलेक्सेई लिओनोव याने आतापर्यंत १५ युवतींचा खून केल्याची जबानी दिली असून हरमल येथे आसामच्या युवतीचा खात्मा केल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.

मोरजी आणि हरमल येथे दोन रशियन महिलांचा निर्दयीपणे गळा चिरून खून करणारा रशियन संशयित आलेक्सेई लिओनोव या पर्यटकाने आतापर्यंत १० ते १५ युवतींचा निर्घृण खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले असून सीरियल किलर महानंद नाईक याच्यानंतरचा हा गोव्यातील दुसरा क्रूर सीरियल किलर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पेडणे तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांच्याशी संपर्क साधला असता, या रशियन पर्यटकाने जे दोन खून केले, त्या युवतींचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते उत्तरीय तपासणीसाठी पाठविले असल्याचे सांगितले. त्याने अशाच प्रकारची आणखी काही कृत्ये केली असतील तर त्याचा पोलिस शोध घेत आहेत, असे सांगितले.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी या प्रतिनिधीने मांद्रे पोलिस ठाण्याला भेट दिली असता, संशयिताने आणखी कुणाचा खून केला की काय, याचा रात्रंदिवस शोध घेत असल्याचे दिसून आले. मांद्रे पोलिस ठाण्यात पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, कॉन्स्टेबल हे ज्या पद्धतीने संशयिताला घेऊन ठिकठिकाणी चौकशीसाठी जात आहेत, त्यावरून त्याने आणखी काही युवतींचा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

लिओनोव याने गिरकरवाडा - हरमल येथे एका भाड्याच्या खोलीत वास्तव्य केलेल्या एलिना कासथोनोवा या ३७ वर्षीय महिलेचा गळा चिरून निर्घृण खून केला. त्यानंतर मधलावाडा - मोरजी येथेही त्याच पद्धतीने एलीना वनिवा या युवतीचा ती पूर्ण नग्नावस्थेतअसताना गळा चिरून खून केला. त्याने हे खून का केले, याविषयी पोलिस वेगवेगळ्या पद्धतीने त्याची जबानी घेत आहेत.

युवतींना प्रेमपाशात ओढायचा अन्...

दोन रशियन युवतींच्या खूनप्रकरणी लिओनोव याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. संशयिताने आणखी काही युवतींना प्रेमाच्या मायाजाळात ओढून त्यांना संपविले असल्याचा संशय असल्याने त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.

कोरगावातही एका युवतीला संपविले

संशयित तपासादरम्यान, त्याने कुठे कुठे या निष्पाप युवतींचे खून केले त्याची जबानी दिलखुलासपणे पोलिसांना देतो. परंतु त्याला आता ती जागा निश्चितपणे दाखवता येत नसल्यामुळे मृतदेह सापडणे कठीण झाले आहे. हल्लीच कोरगाव येथेही एका युवतीचा खून केल्याची जबानी त्याने दिली आहे. परंतु ठिकाण आठवत नसल्याने पोलिसही संभ्रमात पडले आहेत.

हात मागे बांधून अनन्वित अत्याचार

संशयिताने रशियन महिला तसेच युवतींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. प्रेमाच्या जाळ्यात सापडल्यानंतर हसत-खेळत पाठीमागून त्यांचे हात बांधणे आणि नंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने शारीरिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्हेगारी कृत्याची ठिकाणे दाखविण्यात अपयश : पोलिसांना मन:स्ताप

संशयिताने कोणकोणत्या ठिकाणी खून केला, त्या त्या ठिकाणी त्याला नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला; परंतु त्याला निश्चित जागा दाखवता येत नसल्यामुळे पोलिसांच्या डोक्याचा ताप वाढल्याचे दिसून आले. दोन महिन्यांपूर्वी हरमल येथे आसाममधील एका महिलेचाही खून केल्याचा दावा संशयिताने केला. पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू नोंद करून तो मृतदेह आसाममधील कुटुंबीयांच्या स्वाधीन केला होता. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: 12 ऑगस्टपासून संपणार आर्थिक चिंता! पगारवाढ अन् प्रमोशनचा योग; गुरु ग्रहाचा उदय 'या' राशीला करणार मालामाल

VIDEO: 5,100 पाठवत मुलगी म्हणाली, 'व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवा'; लेकरांची वाट बघत बाप गेला निघून, अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी दिला अग्नी

Hardik Pandya KKR Trade: IPL 2027 आधी मोठा ट्विस्ट! कोलकाताचा नवा 'कॅप्टन' हार्दिक पांड्या? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

US Student Visa: अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना 'दे धक्का'! स्टुडंट व्हिसा मंजुरीत 62 टक्क्यांची घसरण; रिपोर्टमधून खुलासा

Salman Khan Assam Flood Relief: 'भाईजान' पुन्हा ठरला देवदूत! आसाममधील पूरग्रस्तांसाठी सलमान खान उभारणार 500 घरं; चाहते म्हणाले, 'Real Life Hero'

SCROLL FOR NEXT