Arambol Crime: हरमल हादरले! हात बांधले, धारदार शस्त्राने केला मानेवर वार; खूनप्रकरणी संशयित रशियन आरोपीला अटक

Arambol Murder Case : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. आरोपी अलेक्सेई याने एलेनावर जीवघेणा हल्ला केला.
Jail | Arrest
Jail | Arrest Dainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: हरमल येथे रशियन नागरिकाने आपल्या मैत्रिणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलेक्सेई लिओनोव्ह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने एलेना कस्थानोव्हा हिचा खून केल्याचा आरोप आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. आरोपी अलेक्सेई याने एलेनावर जीवघेणा हल्ला केला. तिचे हात दोरीने मागे बांधले. त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या मानेवर वार करत गंभीर जखमा केल्या अशी माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात एलेनाचा जागीच मृत्यू झाला.

Jail | Arrest
Sindhudurg Crime: धक्कादायक! वेंगुर्ल्यात जन्मदात्या आईचा मुलाकडून बंदुकीची गोळी झाडून खून

या प्रकरणी हरमल येथील उत्तम नाईक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ०५/२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२) आणि १०३(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना भाड्याने दिलेल्या घरात घडली आहे असे समजते.

Jail | Arrest
Saligao Double Murder: साळगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयिताची आता खैर नाही! गोवा पोलिसांनी उचललं मोठं पाऊल; पळवाटा केल्या बंद!

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे हरमल परिसरात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com