Russian Woman Murder: 1 नाही, 2 रशियन महिलांचा खून! नाव-वय सारखे असल्याने वाढला गोंधळ; संशयित आरोपीच्या कबुलीने गोव्यात खळबळ

Russian Woman Murder: पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी हरमलमधील भाड्याच्या खोलीत एलिना कास्थानोव्हा (वय ३७) हिचा मृतदेह घरमालकाला आढळून आला. तिचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेले होते.
Russian Woman Murder
Russian Woman MurderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : उत्तर गोव्यातील हरमल येथे भाड्याच्या खोलीत एका रशियन महिलेचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत तिच्या जोडीदाराला अटक करण्यात आली होती.

अलेक्सेई लिओनोव (वय ३७, रशियन नागरिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने आणखी एका रशियन महिलेच्या हत्येची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी हरमलमधील भाड्याच्या खोलीत एलिना कास्थानोव्हा (वय ३७) हिचा मृतदेह घरमालकाला आढळून आला. तिचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेले होते, तर गळा धारदार शस्त्राने चिरलेला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शुक्रवारी पहाटे सुमारे चारच्या सुमारास लिओनोवला ताब्यात घेतले.

Russian Woman Murder
Arambol Crime: हरमल हादरले! हात बांधले, धारदार शस्त्राने केला मानेवर वार; खूनप्रकरणी संशयित रशियन आरोपीला अटक

चौकशीत लिओनोवने दुसऱ्या एका महिलेच्या हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांना त्याच्या मार्गदर्शनाखाली मोरजी परिसरात एलिना वानेयेवा (वय ३७) हिचा मृतदेह सापडला. दोन्ही महिला रशियन नागरिक असून त्या काही काळापासून गोव्यात वास्तव्यास होत्या.

Russian Woman Murder
Goa Crime: चोरीसाठी महिलेच्या जिवावर उठला चोर! थरारक घटनेनंतर मडगाव पोलिसांची मोठी कारवाई; संशयिताच्या आवळल्या मुसक्या

खुनामागील नेमका हेतू अद्याप अस्पष्ट असून तपास प्राथमिक टप्प्यात आहे. हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र, घटनास्थळावरील पुरावे आणि आरोपीचे मानसिक स्थिती यांचा तपास सुरू आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून) आणि १२६ (२) (बेकायदेशीर डांबून ठेवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com