Goa Tourist Attack Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Attack: धक्कादायक! मोरजीत रशियन महिलेवर हल्ला; ओठाला जखम तर एक दातही तुटला

पेडणे पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे

Kavya Powar

Goa Tourist Attack: गोव्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी सरकार आणि गोवा पोलिस नेहमीच सतर्क असूनही अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. विशेषत: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांनी सरकारची डोकेदुखी आणखीच वाढवली आहे. हणजूण पर्यटक हल्ल्यानंतर आता अजून एक पर्यटक हल्ल्याची घटना समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मोरजीतल्या एका हॉटेलमध्ये एक रशियन महिला पर्यटक Aigul Davletianova (वय 30) राहण्यास आली होती. तिच्यावर हॉटेलमध्येच काम करणाऱ्या काही कामगारांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. अबिनाश गोरिया (आसाम) आणि मोहोम्मद खान (झारखंड) हे दोघेजण त्याच हॉटेलमध्ये काम करतात. ते रात्री महिला राहत असलेल्या रूमच्या खिडकीमधून आत आले.

आवाजामुळे ती झोपेतून उठली असता त्यांनी तिच्यावर हल्ला करत तिचे हात आणि तोंड घट्ट आवळले. यामुळे तिच्या ओठांना जखम झाली असून तिचा एक दातही तुटल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ मजली असून पेडणे पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Live News: क्रूझ पर्यटनातून मुरगाव बंदर 4.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते

SCROLL FOR NEXT