Goa Drug Case
Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: मोरजीत 1 कोटीचे ड्रग्स जप्‍त; रशियनाला अटक

दैनिक गोमन्तक

Goa Drug Case: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गोव्यात रेलचेल सुरू असतानाच अमली पदार्थ विक्रेत्‍यांचाही सुळसुळाट वाढला आहे. गेल्‍या चार दिवसांत विविध ठिकाणी कारवाया करण्‍यात आल्‍या.

मोरजीत शुक्रवारी एक कोटी 75 हजार रुपये किमतीच्या अमली पदार्थासह रशियन नागरिकाला अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी पथकाने ही धडक कारवाई केली.

अटक केलेल्या संशयिताकडे तब्बल 1 कोटी 75 हजार रुपये किमतीचे चरस, एलएसडी आणि इतर अमली पदार्थ आढळून आले आहेत. पुढील दिवसांत अशा प्रकारच्‍या कारवाईला वेग मिळेल, असे संकेत आहेत.

कळंगुटमध्ये 80 हजाराचा अमलीपदार्थ जप्त

कळंगुट परबवाडा येथे मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी एका परप्रांतीयांकडून 820 ग्रॅम वजनाचा 80 हजाराचा गांजा जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपेंद सिंग (रा. नायकवाडा मूळ रहिवासी मध्य प्रदेश) याला अटक केलीय.

दरम्यान याविषयी मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट पोलीसांना कळंगुट परबवाडा येथे मध्यरात्री एका व्यक्ती आपल्या ग्राहकांना दारूसोबत अमली पदार्थ विक्रीला घेऊन येत असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार बुधवारी रात्री कळंगुटचे पोलीस कॉन्स्टेबल मनोज नाईक, विजय नाईक, अमीर गरड, प्रणय गवस यांच्यासह पीएसआय अक्षय पार्सेकर यांनी सापाळा रचत परबवाडा येथे गस्त घालण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीच्या सुमारास सदर आरोपी त्याच्या ग्राहकांना अंमली पदार्थ ( गांजा) देण्यासाठी

घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी पोलिसांनी छापा टाकून अंमली पदार्थ जप्त करत दीपेंद्र सिंग याला ताब्यात घेतले. याप्रकरणी कळंगुट पीएसआय अक्षय पार्सेकर यांनी अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल तक्रार दाखल करत एनडीपीएस कायदा 1985 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT