पणजी: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तसेच युद्धस्थितीचा परिणाम पर्यटकांच्या नियोजनावर झाला. मात्र, युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोणी कुणासाठी थांबत नाही. मात्र येत्या पर्यटन हंगामात पोलंड, उझबेगिस्तान आणि रशिया येथून पर्यटक येणार असून, रशियन पर्यटकांची संख्या दुप्पट होईल,अशी अपेक्षाही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली.
राज्यातील पर्यटन धोरण आणि आगामी हंगामासाठी आवश्यक उपाययोजनांवर मंगळवारी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तेव्हा ते बोलत होते.
यावेळी पंचतारांकित आणि चार तारांकित हॉटेल्सच्या प्रतिनिधींसह, क्षेत्रातील भागधारक, पर्यटन संचालक केदार नाईक आणि टीटीएजी अध्यक्ष जॅक सुखिजा यांची या बैठकीत उपस्थिती होती. विविध उपविभागातील चर्चांमध्ये सध्याच्या समस्यांपासून ते भविष्यातील धोरणांपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.खंवटे म्हणाले की, शॅक चालक, होमस्टे चालक, वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.
गेस्ट हाऊस आणि विला मालकांसाठी नोंदणी व परवाना धोरण ठरवले जाणार आहे. चांगल्या व्यवसायासाठी पारदर्शकता आणि कायदेशीरता या गोष्टी आवश्यक असल्याचे मंत्री खंवटे यांनी अधोरेखित केले.
मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले की, विमान तिकिट किंमत आणि हॉटेल खोल्यांचे दर वाढल्यामुळे पर्यटक पर्याय म्हणून इतर राज्यांकडे वळत आहेत. गोव्याची संस्कृती आणि पर्यटन एकमेकांपासून वेगळी करता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. पर्यटकांचा अनुभव दर्जेदार असणे आवश्यक असून त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
पर्यटन हेल्पलाईन १३६४ बाबत जनजागृतीचा मुद्दा बैठकीत आला. प्रत्येक पर्यटन टच पॉइंटवर या नंबरचा प्रचार करण्यावर भर दिला आहे. तसेच पर्यटन क्षेत्रातील काही नेत्यांच्या वक्तव्यांवर अप्रत्यक्ष प्रतिक्रिया देत,ते म्हणाले की, नेत्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे कारण त्यांच्या वक्तव्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटन प्रतिमेवर होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.