Vivanayak volvoikar Dainik Gomantak
गोवा

Rumdamol panchayat : रुमडामळ पंचायत बरखास्त करा : पंच विनायक वळवईकर

बेकायदेशीर कृत्यांना आळा बसत नाहीत, तोपर्यंत तेढ कायम

गोमन्तक डिजिटल टीम

रुमडामळ पंचायत ज्यांच्या हातात आहे, ते जातीय तेढ निर्माण करण्याचा निर्णय घेऊ लागले आहेत. या पंचायत परिसरात जी बेकायदेशीर कृत्ये सुरू आहेत, त्यांना पंचायतीचा पूर्ण पाठिंबा आहे.

पंचायतीची परवानगी नसताना बांधकामे सुरू आहेत. ती बंद करण्यासाठी पंचायत काहीच पुढाकार घेत नाही. सरकारने याची दखल घेऊन पंचायत बरखास्त करावी, अशी मागणी रुमडामळ येथील पंच विनायक वळवईकर यांनी केली.

वळवईकर पुढे म्हणाले, जोपर्यंत परिसरातील बेकायदेशीर कृत्यांना आळा बसत नाहीत, तोपर्यंत ही तेढ कायम राहील. येथे मुस्लीम वा हिंदू असा भेदभाव मुळीच नाही, तरी बेकायदेशीर बांधकामे, बेकायदेशीर स्क्रॅपयार्ड, गोंमास विक्री दुकानासारखे धंदे हे प्रमुख कारण आहे. शिवाय त्यामुळे अरुंद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

शंभर चौरस मीटर जागेत तीन मजली इमारती उभ्या होतात, त्याला काय म्हणायचे. ज्या घरांमध्ये बेकायदेशीर मदरसा सुरू आहे, तो बंद करावा. दोन महिन्यापूर्वी पंचायतीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता. अजूनही या मदरसा बंद करण्याची नोटीस पाठविण्यात आलेली नाही.

दरम्यान, रुमडामळ-दवर्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असल्याचे उपअधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले.

रुमडामळ दवर्ली पंचायत परिसरात गेले तीन चार दिवस बॅनर्स फाडणे, बसच्या काच फोडणे, चाकूने हल्ला करणे सारख्या भयानक घटना घडत आहे. त्यासाठी त्या परिसरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. आज रुमडामळ येथील दोन्ही गटातील प्रतिनिधींना पोलिस स्थानकावर बोलावून पोलिस उपअधिक्षक संतोष देसाई यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना काही सूचना केल्या.

या भागात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असून त्याचसाठी दोन्ही गटातील प्रतिनिधींना बोलावून समज देण्यात आला. पोलिस कुमकही ठेवण्यात आली आहे.
संतोष देसाई, उपअधीक्षक.

संशयिताला दोन दिवसांची कोठडी

रूमडामळ-दवर्ली पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेला संशयित आरोपी आयुब खान याला आज मडगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

दरम्यान, वळवईकर यांना समाज माध्यमावरून धमकी दिल्याचा आरोप असलेल्या वास्को येथील अब्दुल रझाक यालाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT