Goa Assembly Monsoon Session 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: ST आरक्षणासंदर्भातील डिकॉस्तांच्या खासगी विधेयकावरून वाद संपेना! प्रश्नोत्तराचा तास गेला वाहून

Goa Assembly Monsoon Session 2024: सरकारी पक्षाने हे मुद्दाम केले. सरकारला नव्या शैक्षणिक धोरणाविषयी प्रश्नांना सामोरे जायचे नव्हते.

गोमन्तक डिजिटल टीम

सभापती रमेश तवडकर यांच्या संदर्भात विधानसभेबाहेर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केप्याचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी माफी मागावी, या मागणीसाठी सत्ताधारी आज विधानसभेत आक्रमक झाले.

खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा विषय लावून धरला. यावेळी प्रेक्षागृहात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी डिकॉस्ता हक्कभंग ठरावाला सामोरे जातील, पण माफी मागणार नाहीत, अशी भूमिका घेतली. डिकॉस्ता यांनी मी काय गुन्हा केला, असे विचारण्याचा प्रयत्नही केला. या गदारोळात दोन वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले आणि प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाजच झाले नाही.

सरकारी पक्षाने हे मुद्दाम केले. सरकारला नव्या शैक्षणिक धोरणाविषयी प्रश्नांना सामोरे जायचे नव्हते. विरोधकांना सरकार घाबरले, त्यामुळे त्यांनीच हा प्रश्नोत्तर तास गुंडाळला असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई दुपारच्या सत्रात विधानसभा संकुलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्यासोबत हळदोण्याचे आमदार अॅड कार्लस फेरेरा होते.

सरदेसाई म्हणाले, हे प्रश्न चर्चेला येऊ नयेत, यासाठी पडद्याआड अनेक घडामोडी गेल्या २४ तासात घडल्या. हक्कभंग ठराव आणण्यात येणार आणि त्याआधारे सत्ताधारीच कामकाज होऊ देणार नाहीत, याचा विचार देखील आम्ही केला नव्हता.

सर्वसाधारणपणे विरोधक कामकाज बंद पाडतात, पण प्रथमच सत्ताधाऱ्यांनी कामकाज बंद केलेले आम्ही पाहिले. शैक्षणिक धोरण व वीज दरवाढ हे प्रश्न सरकारला अडचणीचे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

Operation Sindoor: भारताने अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावून लावला... 'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा मोठा खुलासा VIDEO

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT