Goa Weather: गोव्यात पावसामुळे कुठे, काय घडले? वाचा Monsoon अपडेट

Goa Monsoon 2024: केरी-सत्तरीतील अंजुणे धरणाची पातळी 90 मीटर गाठण्यास काही सेमी बाकी आहे.
Goa Monsoon 2024: गोव्यात 24 तासांत 6.3 इंच बरसला; पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत
Goa Monsoon 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात झाडे कोसळणे, दरड, घराच्या भिंती कोसळणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणे अशा घटना सुरूच आहेत.

रत्नागिरीजवळ कोसळलेली दरड हटविण्यात कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना यश आले असून, मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत एकूण ६.०३ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यातील प्रमुख घटना

1) शिगाव काऱ्यामळ येथील सुकुर फर्नांडिस यांच्या घरावर वादळी वाऱ्याच्या तडाख्याने आंब्याचे झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान. स्थानिक सरपंच व पंच प्रसाद गांवकर घटनास्थळी अग्निशामक दलाला पाचारण.

2) शिगाव येथे घरावर पडलेले झाड काढण्यासाठी येताना बोलेरो आणि अग्रिशामक दलाच्या गाडीचा भीषण अपघात.

3) केरी-सत्तरीतील अंजुणे धरणाची पातळी 90 मीटर गाठण्यास काही सेमी बाकी. नदीची व पावसाची परिस्थिती पाहून धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता.

4) पेन्हा दी फ्रान्स येथील पडक्या घराची भिंत कोसळली.

Goa Monsoon 2024: गोव्यात 24 तासांत 6.3 इंच बरसला; पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत
Konkan Railway News: 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत

शिशुवाटिकेत घराची कोसळली भिंत !

शांतादुर्गा शिशुवाटिकेत बाजूच्या टेकून असलेल्या घराची भिंत कोसळण्याची घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून आज पावसामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आज (सोमवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घराच्या भिंतीचा ढिगारा शिशुवाटिकेच्या 'पॅसेज" मध्ये कोसळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com