Anjuna Music Event Protest Dainik Gomantak
गोवा

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Anjuna Music Event Protest: ग्रामसभेत आपले मत व्यक्त करत असतां दोन विरोधी पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आणि म्हणूनच ग्रामसभा स्थगित करावी लागली अशी माहिती हणजूणचे सरपंच लक्ष्मीदास चिमूलकर यांनी दिली

Akshata Chhatre

Mega Events Row Anjuna Gram Sabha Ruckus Video Viral

म्हापसा : गोव्यातील संगीत महोत्सवांवरून सुरू असलेला वाद रविवारी चिघळला. हणजूण येथे संगीत महोत्सवासंदर्भात आयोजित ग्रामसभेत धक्काबुक्कीची घटना घडली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्रामसभेत उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

हणजूण आणि लगतच्या भागांमधील संगीत महोत्सवांना स्थानिकांकडून विरोध केला जातोय. रविवारी याच संदर्भात हणजूण येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. रविवारी सभेला सुरूवात होताच महोत्सवांना विरोध करणाऱ्या गटाने बाजू मांडायला सुरूवात केली. याच दरम्यान दुसऱ्या गटाने परिसरात होणारे संगीत महोत्सव बंद करू नये, अशी भूमिका मांडली. यावरून वाद सुरू झाला.

परिस्थिती इतकी टोकाला गेली विरोध करणाऱ्या तरुणाला धक्काबुक्की करण्यात आली. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वादामुळे ग्रामसभा स्थगित करावी लागली असून १५ डिसेंबरला पुढील ग्रामसभा होईल, अशी माहिती सरपंच लक्ष्मीदास चिमूलकर यांनी दिली.

संगीत महोत्सवांवरून स्थानिकांमध्ये मतभेद का आहे?

सनबर्नसारख्या संगीत महोत्सवांमुळे ध्वनीप्रदूषण होते, तसेच पर्यावरणाचीही हानी होतेय, असे स्थानिकांच्या एका गटाला वाटते. या संगीत महोत्सवांमुळे आरोग्यवरही परिणाम होत असून शांतताप्रिय राज्याचे वातावरण बिघडतेय, असा या गटाचा आक्षेप आहे. या महोत्सवांवर वेळीच आळा घालावा, अशी मागणीही केली जातेय. नुकतेच यासंदर्भात निदर्शनंही करण्यात आली होती.

तर काही स्थानिक या महोत्सवाचे समर्थनही करतात. गोव्यातील पर्यटन वाढावे, असे वाटत असेल तर अशा महोत्सवांचे आयोजन केलेच पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. हणजूणसारख्या भागात होणाऱ्या या महोत्सवांमुळे स्थानिकांना रोजगार मिळतो, चार पैसे जास्त कमावता येतात.

तसेच रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने सरकारी नोकरीची सुद्धा गरज वाटत नाही, असा दावाही समर्थकांकडून केला जातो. १५ डिसेंबरला होणाऱ्या ग्रामसभेत याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: हत्तीने कारला खेळण्यासारखं हवेत उडवलं, ड्रायव्हर थोडक्यात बचावला; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन अटकेत, रचला होता मोठा कट

Viral Post: "शेर कभी शिकार करना नहीं भूलता!" रोहितच्या वादळी खेळीवर युवीची प्रतिक्रिया; पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT