<div class="paragraphs"><p>Foreign Tourists</p></div>

Foreign Tourists

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांचे अलगीकरण सक्तीचेच!

दैनिक गोमन्तक

पणजी: ओमिक्रॉन संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात प्रतिबंधक उपाय अत्यंत कडकपणे राबविणे आवश्यक आहे. विदेशातून देशात येणाऱ्या पर्यटकांना (Foreign Tourists) दाबोळी विमानतळावर (Airport) आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी सक्तीची करावी, त्यांना सात दिवस घरी अलगीकरण करणे भाग पाडावे आणि सलग आठ दिवस त्यांनी अधिक लोकांशी संपर्क टाळावा, असे आवाहन राज्य सरकारच्या तज्ज्ञ व टास्क फोर्सच्या सदस्यांनी केले आहे.

राज्य सरकारचे (Goa Government) कोविडविषयक वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी ही सूचना सरकार अंमलात आणणार असल्याची माहिती तज्ज्ञ समितीला दिली असली तरी परदेशातून गोव्याला (Goa) भेट देणाऱ्या लोकांचे अलगीकरण हे सक्तीने पाळणे आवश्यक बनले आहे, अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. धनेश वळवईकर यांनी आज दै. ‘गोमन्तक’ला दिली.

डॉ. वळवईकर आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचे गोवा प्रमुख डॉ. विनायक बुवाजी यांनी आज ‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात भाग घेतला. दोघांनीही गोव्यात कोविड संरक्षण कवच सैल झाल्याची कबुली दिली. गोव्यात उत्सव अधिक झाले आहेत आणि जनतेमध्येही सुरक्षिततेची भावना लोप पावली आहे. राज्य सरकारकडूनही सक्तीने उपाय योजले जात नाहीत.

बुस्टर लस राज्यात लवकर येणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने याबाबत तातडीने उपाययोजना करावी. कोविड (Covid) विरोधातील लसीकरणाला राज्यात योग्य प्रतिसाद आहे आणि अजूनही ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी ती घ्यावी. कारण ती प्रभावकारी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रयोगशाळा हवी

अनेकजण नववी, दहावी वर्गात न जाता उत्तीर्ण झाले आहेत. त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर झाला आहे. ‘जीनोम सीक्वेन्सिंग’ची प्रयोगशाळा राज्यात लवकर स्थापन व्हावी. कारण प्रयोगशाळेतील नमुन्यांचे निकाल गोव्यात यायला किमान 15 दिवस लागतात, असे तज्ज्ञ म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Bloomberg Billionaires Index: मुकेश अंबानी जगातील 11वे सर्वात श्रीमंत व्यक्ती; ब्लूमबर्गने 'सुपर रिच' लोकांची यादी केली जाहीर

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

SCROLL FOR NEXT