भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकास असलेला माहिती हक्क कायदा अस्तित्वात आल्यास वर्षे लोटली. मात्र, कसलाही संबंध नसताना, अन्य गावातील एका जागेबाबत माहिती मागणे बरेच महागात पडू शकते याचे ताजे उदाहरण हरमल पंचायत क्षेत्रात घडले आहे.
सध्या हरमल पंचायत बेकायदेशीर व कायदेशीर प्रकल्पाच्या बाबतीत ‘हिट लिस्ट’वर असल्याने आरटीआय अर्जदाराला धक्काबुक्की करण्याची घटना घडली आहे.
तुये गावातील आरटीआय कार्यकर्ते अनिल हरमलकर यांनी हरमल पंचायत क्षेत्रातील एका जमिनीबाबत सविस्तर माहिती अर्जाद्वारे मागितली होती. मध्यंतरी न्यायालयाच्या आदेशानुसार माहिती संकलन करण्याच्या कारणामुळे पंचायत कार्यालयास माहिती देण्यास उशीर झाला होता.
त्यामुळे अनिल हरमलकर यांनी नाराजीच्या सुरात पंचायत कार्यालयात भेट दिली व जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान त्याची वाच्यता बाहेर पसरल्याने काहीजण जमा झाले व त्यास जाब विचारला व समाधानी न झाल्याने त्यास धक्काबुक्कीही केली. यावेळी घटनास्थळी पोलिस पोचले. मात्र, तत्पूर्वीच जमा झालेले नागरिक घरी परतले होते.
पोलिसांनी पंचायत कार्यालयात भेट दिली व सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचायत कार्यालयाबाहेर घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर कळू न शकल्याने ते माघारी फिरले.
‘त्याने नाक का खुपसावे’
अनिल हरमलकर हा तुये गावचा असून त्याला हरमल भागातील जमिनीबाबत कसली माहिती हवी होती, त्याचा काय हेतू होता याबाबत स्थानिक नागरिक किंचित नाराज होते. गावाबाहेरील व्यक्तीस आपल्या गावातल्या गोष्टीत नाक खुपसण्याची काय गरज होती, असा सवाल हरमलमधील नागरिक करीत आहेत.
‘तो’ आरजीचा कार्यकर्ता?
प्राप्त माहितीनुसार, तुये गावचा हरमलकर हा आरजी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जाते. मात्र, हा पक्ष स्थानिक लोकांचा कैवारी असल्याचा बोलबाला आहे. त्यामुळे माहिती प्राप्त करण्याचा त्याचा इरादा काय होता, असा सवाल व चर्चा गावात सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.