V. K. Pandian: मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाने दिला राजीनामा; 24 तासांत मिळाले कॅबिनेट मंत्रीपद...

थेट मुख्यमंत्र्यांना करणार रिपोर्टिंग
V. K. Pandian
V. K. PandianDainik Gomantak

V. K. Pandian: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे खाजगी सचिव असलेले व्ही. के. पांडियन यांनी निवृत्ती घेतली. पण, निवृत्तीनंतर अवघ्या २४ तासांत त्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे.

आयएएस अधिकारी पांडियन यांनी सोमवारी व्हीआरएस (स्वैच्छिक सेवानिवृत्ती) घेतली होती. मंगळवारी, त्यांची कॅबिनेट मंत्री पदासह ओडिशा राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 5T इनिशिएटिव्हचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

व्ही. के. पांडियन हे 2011 मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात (सीएमओ) रुजू झाले होते. तेव्हापासून ते मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे खाजगी सचिव आहेत.

ओडिशात 5T उपक्रम सुरू करण्याची कल्पना पांडियन यांचीच होती. त्याअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय विभागांमध्ये प्रशासन चोख ठेवायचे होते. 5T मध्ये ट्रान्सपरन्सी, टीमवर्क, टेक्नॉलॉजी, टाईम आणि ट्रान्सफॉर्मेशन यांचा समावेश आहे.

V. K. Pandian
Goa Temperature: गोव्यात ऑक्टोबर हीटला सुरवात; पणजीत कमाल तापमानाची नोंद

आता मंत्री म्हणूनही पांडियन थेट मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली काम करतील. राज्य सरकारच्या प्रमुख योजना, कार्यक्रम आणि प्रकल्प 5T अंतर्गत येतात. या 5T चा ओडिशा सरकारच्या जवळजवळ प्रत्येक विभागात प्रभाव आहे.

पांडियन हे ओडिशा केडरचे सन 2000 बॅचचे IAS अधिकारी आहेत. कालाहंडी जिल्ह्यातील धरमगढ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची नागरी सेवेची कारकीर्द सुरू झाली होती. त्यानंतर मयूरभंज आणि गंजाम येथे ते जिल्हाधिकारी होते.

2011 मध्ये ते मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) रुजू झाले आणि तेव्हापासून ते पटनायक यांचे खाजगी सचिव आहेत. गेल्या 12 वर्षांत पटनायक सरकारच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पांडियन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मोठे प्रकल्प हाताळले

श्री जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉर, श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प यासारख्या मेगा प्रकल्पांमध्येही पांडियन यांनी मोठी भूमिका बजावली. जे या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

श्री जगन्नाथ मंदिराच्या बाहेरील भिंतीभोवती 75 मीटरचा कॉरिडॉर तयार केला जात आहे. पूर्ण झाल्यानंतर भाविकांना दूरवरून मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. पांडियन यांनी राज्यातील प्राचीन आणि प्रतिष्ठित मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या उपक्रमावरही देखरेख केली.

V. K. Pandian
Goa Literacy Rate: गोवा 7 महिन्यात बनणार 100 टक्के साक्षर राज्य! 1500 निरक्षरांचे शिक्षण सुरू...

मो सरकारचे जनक

पांडियन ओडिशात 'मो सरकार' लाँच करण्यासाठी देखील ओळखले जातात. हा उपक्रम 2 ऑक्टोबर 2019 रोजी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच 21 जिल्हा मुख्यालये, रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आला.

सरकारी कार्यालयात येणाऱ्या लोकांना सन्मानाने मदत करणे हा त्याचा उद्देश आहे.

दरम्यान, काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे की, पांडियन हे चांगले अधिकारी आहेत आणि त्यांनी नवीन पटनायक यांना खूप मदत केली. पण आता ते राजकीय व्यक्ती बनणार आहेत. ओडिशात दीड दशकांहून अधिक काळ विचित्र परिस्थिती आहे.

मुख्यमंत्री तेथील जमीनदारासारखे असून त्यांचे मुख्य सहकारी राज्याचे सीईओ म्हणून काम करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com