RTI activist attacked  Dainik Gomantak
गोवा

Goa: RTI कार्यकर्त्यावर लोखंडी सळीने हल्ला

RTI कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक गंभीर अवस्‍थेत गोमेकॉत (GMC) दाखल; हल्लेखोरांनी लपवले होते चेहरे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: सांकवाळ (Sancoale) येथील सामाजिक आणि आरटीआय (RTI) कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांच्यावर आज शनिवारी दुपारी दोघांनी लोखंडी सळीने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी बुरखा घातला होता. या हल्ल्यात नाईक गंभीर जखमी झाले असून उपचारांसाठी त्‍यांना गोमेकॉत (GMC) दाखल करण्‍यात आले आहे. दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक यांचे ते बंधू आहेत.

सदर प्रकार दुपारी बाराच्या सुमारास घडला. नारायण नाईक कामानिमित्त सांकवाळ पंचायतीत गेले होते. तेथील काम आटोपून आपल्या गाडीकडे येत असताना दोघांनी त्‍यांच्यावर हल्ला केला. विशेष म्‍हणजे पाऊस नसतानाही हल्लेखोर रेनकोट घालून आले होते. तसेच त्यांनी आपला चेहरा पूर्ण झाकला होता. त्यामुळे हल्लेखोर कोण, हे समजू शकले नाही. या हल्‍ल्‍यात नाईक यांच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून, उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यावेळी नाईक यांच्यासोबत त्यांचा एक मित्र होता. त्याने हल्लेखोरांना रोखण्‍याचा प्रयत्‍न केला, पण बंदूक काढून दाखवताच तो मागे सरला. याच संधीचा फायदा घेत हल्लेखोर आपल्‍या दुचाकीवरून पसार झाले. हल्ल्याचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT