मोहन भागवत (Mohan Bhagwat) Dainik Gomantak
गोवा

Mohan Bhagwat : RSS च्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी भागवत सोमवारपासून गोव्यात

अधिवेशनात संघ परिवारातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार

गोमन्तक डिजिटल टीम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत गोव्यात येत आहेत. 2 ते 7 जानेवारी दरम्यान गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात संघ परिवारातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. भागवत येत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन २ ते ७ दरम्यान फोंडा तालुक्यातील नागेशी येथे होत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचा आयोजन केल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.

आंबेकर म्हणाले, २ ते ४ जानेवारी दरम्यान संघाशी संबंधित विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका नागेशीत होतील. ५ आणि ६ जानेवारीला संघ परिवाराच्या राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक होईल. यात (RSS) सरसंघसंचालक डॉ. मोहन भागवत, सहकार्य दत्तात्रेय होसबाळे, विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशिष चौहान, भारतीय मजदूर संघाचे बी सुरेंद्रन, भारतीय जनता पार्टीचे बी. एल. संतोष याशिवाय विद्याभारती, भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी या बैठकींना उपस्थित असतील. ७ जानेवारी रोजी सरसंघचालक डॉ. भागवत संघ परिवारातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT